Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 27 मार्च 2021 शनिवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 27 मार्च 2021 शनिवार | ABP Majha
1. महाराष्ट्रात दिवसभरात 36 हजार 902 नव्या रुग्णांची नोंद, राज्यात उद्यापासून रात्रीची जमावबंदी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुख्यमंत्र्यांचा निर्णय
2. पुणे जिल्ह्यात काल तब्बल 7 हजाराहून अधिक रुग्णांची भर, रुग्णसंख्या वाढत राहिल्यास लॉकडाऊन अनिवार्य, अजित पवारांचा इशारा, नाशिककरांनाही भुजबळांकडून 2 एप्रिलपर्यंत अल्टिमेटम
3. फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा, फडणवीस, रश्मी शुक्ला, सीताराम कुंटे यांचा जबाब घेतला जाण्याची शक्यता
4. शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे तपासण्याची गरज, युपीएचे अध्यक्ष पद शरद पवार यांना देण्यात यावं या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांच्याकडून समाचार
5. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क, सोलापूर, कल्याण-डोंबिवलीत वीकेंड लॉकडाऊन, लातुरात 4 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध तर नंदुरबार-धुळ्यात जनता कर्फ्यू
6. पालघर जिल्ह्यात 5 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू, शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय, मात्र अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार
7. पुणे शहराच्या कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटवर आगडोंब, कपड्यांची अनेक दुकानं जळून खाक
8. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान, बंगालच्या 30 तर आसाममधील 47 जागांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार
9. मोदींच्या बांगलादेश दौऱ्याचा आज दुसरा दिवस, मोदी आज बांगलादेशीतील मंदिरांना भेटी देणार
10. इंग्लंडकडून दुसऱ्या वन डेत टीम इंडियाचा सहा विकेट्सनी धुव्वा, मालिकेत बरोबरी; जॉनी बेअरस्टोचं झळकावलं धडाकेबाज शतक