Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 जुलै 2021 | शनिवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 जुलै 2021 | शनिवार | ABP Majha
1. पूर आणि दरड दुर्घटनेमुळं राज्यात दोन दिवसांत 129 जणांचा मृत्यू; रायगड, साताऱ्यात डोंगर काळ बनून कोसळले, बचावकार्याचं मोठं आव्हान
2. महाडच्या तळीये गावात दरड कोसळल्यामुळं 38 जणांचा मृत्यू, साताऱ्यात विविध ठिकाणी दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू, आंबेघर 40 तासांनंतरही मदतीच्या प्रतीक्षेत
3. कोल्हापुरात पंचगंगा 56 फुटांवर, सांगलीत कृष्णा नदीची पातळी वाढली; पावसाची उसंत आणि अलमट्टीमधला विसर्ग सुरु असल्यानं काहीसा दिलासा
4. चिपळूणमध्ये रुग्णालयात पाणी शिरल्यानं 9 रुग्णांचा मृत्यू, व्हेटिंलेटर बंद झाल्यानं जीव गमावला तर शहरातील पाणी ओसरलं, महाड शहरात चिखलाचं साम्राज्य
5. अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या रत्नागिरी आणि साताऱ्याला रेड अलर्ट; पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग रायगड आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट
6. शासकीय कार्यालयात फोनवर सौजन्यपूर्ण भाषा वापरा, राज्य सरकारची नियमावली, लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉल्सला तात्काळ उत्तर द्यावं लागणार
7. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ; खंडणी मागितल्याप्रकरणी दुसरा गुन्हा ठाण्यात दाखल
8. पॉर्न फिल्मप्रकरणी उद्योगपती राज कुंद्रांच्या घरावर गुन्हे शाखेचे छापे, शिल्पा शेट्टीचीही तीन तास चौकशी करून जबाब नोंदवला
9. शासकीय वापराकरिता इलेक्ट्रिक वाहनांचीच खरेदी बंधनकारक, मुंबई-पुण्यासह सहा शहरांमध्ये धोरण लागू, 930 कोटींची तरतूद
10. 19991 च्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेसमोर कोरोनामुळं मोठं आव्हान, माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांचा इशारा