Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 ऑगस्ट 2021 | सोमवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दरदिवशी रुग्णसंख्या चार ते पाच लाखांनी वाढण्याची भिती, निती आयोगाचा केंद्राला अलर्ट, दोन लाख आयसीयू बेड सज्ज ठेवण्याच्या सूचना
2. भाजीपाल्यांचे दर कोसळल्यानं शेतकरी हवालदिल, किलोला दहा रुपयेसुद्धा मिळत नसल्यानं उत्पादन खर्च काढणंही मुश्कील
3. अडीच महिन्यानंतरही आयकरच्या वेबसाईटचा गोंधळ कायम, इन्फोसिसच्या सीईओंना अर्थमंत्रालयाचं समन्स, करदात्यांसमोर सप्टेंबरची डेडलाईन
4. हॉलमार्क सक्तीविरोधात सराफांचा देशव्यापी संप, घडणावळ वाढण्याची भिती व्यक्त करत हॉलमार्कला विरोध
5. मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज अयशस्वी, सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू, मंत्रालयात प्रवेश नाकारल्यानं केलेलं विषप्राशन
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 ऑगस्ट 2021 | सोमवार | ABP Majha
6. नमामी गोदा प्रकल्पासाठी नाशिक महापालिकेकडून एक हजार 842 कोटींचा प्रकल्प सादर, महापालिका निवडणुकींच्या तोंडावर निधी मंजूर होण्याची भाजपला प्रतिक्षा
7. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, काँग्रेसच्या आशिष देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
8. सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांना आजपासून दिलासा, सर्व दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार, लग्नासाठी 50 जणांना तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
9. अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये तालिबान आणि अहमद मसूदच्या गटात जोरदार युद्ध, पंजशीरसह आजबाजूचे तिनही जिल्हे तालिबान्यांकडून मसूदच्या ताब्यात
10. श्रावणी सोमवारनिमित्त पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सजलं, कल्याणच्या भक्ताकडून फुलांची आकर्षक सजावट