Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 जून 2021 बुधवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 जून 2021 बुधवार | ABP Majha
1. महाराष्ट्रात मंगळवारी लसीकरणाचा उच्चांक, एकाच दिवशी 5 लाख 52 हजार नागरिकांना दिली लस
2. टाटा रुग्णालयातील कॅन्सरग्रस्तांना म्हाडाच्या शंभर खोल्या राखीव ठेवण्याच्या निर्णयाला स्थगिती, राष्ट्रवादीच्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावल्याची चर्चा
3. आमदारांच्या संख्येनुसार महामंडळ वाटपासाठी सेना आग्रही, तर काँग्रेसकडून समसमान महामंडळ वाटपाची मागणी
4. कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरियंटनं चिंता वाढवली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळला केंद्र सरकारचा अलर्ट
5. कोरोनामुक्त झालेल्या गावात दहावी बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत तपासणी करावी, मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला सूचना
6. राज्य सरकारकडून घरोघरी लसीकरणाची तयारी, टास्क फोर्सची नियमावली तयार, अहवाल बंद लिफाफ्यात हायकोर्टात सादर
7. कांदिवली बोगस लसीकरण घोटाळा, लसीकरण कॅम्पवर भरवसा कसा ठेवायचा? मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
8.आयसीयूत दाखल असलेल्या रुग्णाचे डोळे उंदरानं कुरतडले, मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातला प्रकार, महापालिकेकडून चौकशीचे आदेश
9. धमक्यांच्या फोन कॉलनंतर लंडन गाठणारे सीरमचे सीईओ अदर पुनावाला भारतात परतले, वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्राचा निर्णय
10. मोहमद शामी आणि इशांत शर्माच्या भेदक माऱ्यामुळं न्यूझीलंडचा डाव 249 धावांवर आटोपला, तर दुसऱ्या डावात भारताची 32 धावांची आघाडी