Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 जुलै 2021 बुधवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 जुलै 2021 बुधवार | ABP Majha
1. आज आणि उद्या महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, प्रशासनाला अलर्ट
2. सलग दुसऱ्या वर्षी बकरी ईदवर कोरोनाचं सावट, निमय पाळून नमाज अदा करण्याचं प्रशासनाचं आवाहन
3. देशातील 68 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज, 40 कोटी लोकांना कोरोनाचा धोका कायम, सेरो सर्व्हेचा अहवाल
4. आजही मुंबईतील लसीकरणाला ब्रेक, पुरेशा लस साठ्याअभावी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद
5. H5-N1 अर्थात बर्ड फ्ल्यूची लागण झालेल्या 11 वर्षीय मुलाचा दिल्लीत मृत्यू, उपचार करणारे एम्समधील डॉक्टर आणि नर्स विलगीकरणात
6. केंद्र सरकार ज्याप्रकारे विषय फिरवतंय, त्यावरुन स्पष्ट होतंय 'दाल में कुछ काला है', पेगॅसस प्रकरणी नवाब मलिक यांची भाजपवर टीका
7. नियम मोडून नवश्या गणपतीची आरती करणारे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना नाशिक पोलिसांचं अभय, मात्र पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा
8. 'माझा'च्या स्टिंग ऑपरेशननंतर ठाण्यातील बारवर कारवाईचा धडाका, पालिकेकडून 15 लेडीज आणि डान्सबार सील, परवानेही रद्द होणाची शक्यता
9 .महाराष्ट्रात लवकरच वीजेचे पोस्टपेड-प्रिपेड स्मार्टमीटर येणार, उर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती, मोबाईल प्रमाणेच वीजेच्या मिटरलाही रिचार्ज
10. दीपक चहरच्या नाबाद 69 धावांच्या खेळीमुळं भारतानं विजयश्री खेचून आणली, सलग दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला नमवून मालिकाही जिंकली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
