Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 सप्टेंबर 2021 रविवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 सप्टेंबर 2021 रविवार | ABP Majha
1. जलदगती न्याय काय असतो ते नराधमांना दाखवून द्या, जेणेकरून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आदेश
2. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरुच, साकीनाकानंतर अमरावती, वसई, पिंपरी, उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटनांची नोंद
3. ओबीसी आरक्षणासाठी राज्याला निवडणूक लांबणीवर टाकण्याचे अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं ठाकरे सरकारसमोर मोठा पेच
4. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेची एन्ट्री, 403 जागांवर निवडणूक लढवण्याची पक्षाची घोषणा
5. टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ नाही तर स्वेच्छा निवृत्तीचा नारळ, नागपूरच्या कार्यक्रमात गडकरींचा शास्त्रज्ञ, प्राध्यापकांना इशारा
6. नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात बाचाबाची, आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरुन खडाजंगी
7. रुपाणींच्या राजीनाम्यानंतर गुजरातच्या नव्या मुख्यमंत्रिपदाचं नाव आज जाहीर होणार, दुपारी दोन वाजता महत्त्वाची बैठक, पाटीदार समाजाचे नेते शर्यतीत
8. 40 लाखांच्या खंडणीसाठी नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण, तीन दिवसांत केली मुलाची सुखरूप सुटका, ठाणे क्राईम ब्रँचची कौतुकास्पद कामगिरी
9. कैद्यांचा जेलरसह पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील घटनेमुळे एकच खळबळ
10. तेलंगणामध्ये ड्रोनच्या मदतीनं कोरोना लस आणि इतर औषधांचा पुरवठा, मेडिसिन फ्रॉम स्काय योजनेला शनिवारपासून सुरुवात