Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 12 फेब्रुवारी 2022 : शनिवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
1.प्रियांका गांधी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी तयार, एबीपी न्यूजच्या कार्यक्रमात केली घोषणा, मात्र कोणती निवडणूक लढणार हे गुलदस्त्यात
2. निलंबन रद्द झालेल्या 12 आमदारांना पुन्हा अधिकार बहाल, विधानपरिषदेचे सभापती निंबाळकरांची अधिकृत घोषणा, सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करत असल्याची राष्ट्रपतींकडे तक्रार
3. शिवसेनेनं धक्काबुक्की केलेल्या पायऱ्यांवरच भाजपकडून सोमय्यांचा सत्कार, तर त्याच पायऱ्यांवर काँग्रेसनं गोमूत्र आणि गुलाबपाणी शिंपडलं, सोमय्यांचा घणाघात
4. माघी एकादशीनिमित्त कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच गजबजली पंढरी; चार लाख भाविक दाखल
Maghi Ekadashi 2022 : आज माघ शुद्ध अर्थात जया एकादशी. कोरोनाच्या महामारीनंतर जवळपास सहा महत्वाच्या वाऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आजची माघी वारी कोरोना नंतरची पहिली वारी आहे ज्या वारीला वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यामुळं वारकऱ्यांमध्ये देखील चैतन्याचं वातावरण आहे. दरम्यान माघीच्या निमित्तानं विठुरायाची महापूजा मंदिर समितीचे सदस्य अतुल महाराज भगरे यांच्या हस्ते तर रुक्मिणी मातेची महापूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते पार पडली. एसटीचा संप असूनही जवळपास चार लाख भाविक या सोहळ्यासाठी पंढरीत दाखल झाल्याने पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाली आहे. विठुरायाच्या प्रमुख यात्रांपैकी माघी यात्रा ओळखली जाते. आज या सोहळ्यानिमित्त विठुरायाची महापूजा भगरे गुरुजी यांनी सपत्नीक केली. रुक्मिणी मातेची महापूजा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सपत्नीक केली.
5. शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान, कुणाचंही स्मृतीस्थळ नको, स्थानिक रहिवाशाची उच्च न्यायालयात धाव, न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
6. मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा; भाजप मनपा गटनेते प्रभाकर शिंदेंचा स्थायी समितीत आरोप
मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपनं स्थायी समितीत केला आहे. मुंबईकरांचा त्रास दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या किटक नाशक विभागाच्या माध्यमातून उंदरांचा नायनाट करण्यात येतो. उंदिर मारण्याबाबतचा 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. त्यात ए ते टी विभागात म्हणजेच मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 1 कोटी रुपये खर्च करून उंदिर मारण्यात आल्याचे म्हटले आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे. प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे की, एक उंदिर मारण्यासाठी 20 रुपये तर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक उंदिर मारल्यास प्रत्येक उंदिर मारण्यास 22 रुपये या दराने उंदिर मारण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. पालिकेने केवळ 5 वॉर्डमध्ये 1 कोटी रुपये खर्च करून उंदीर मारले आहेत. मात्र किती उंदिर मारले याचा आकडा पालिकेने दिलेला नाही, प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे. उंदरांच्या उत्पतीची कारणे कोणती ती सुद्धा प्रस्तावात दिलेली नाहीत. यामुळे नक्कीच उंदिर मारले गेले का यावर शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला.
7. नाशिकमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रकार, बागलाण तालुक्यातील धक्कादायक घटना, तरुणीसह कुटुंबीय अटकेत
8. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज आंबडवे दौऱ्यावर; मंडणगडमध्ये छावणीचे रुप, दौऱ्यासाठी जय्यत तयारी
9. आयपीएलच्या पंधराव्या मोसमासाठी आज खेळाडूंचा लिलाव, 10 संघांसाठी 600 खेळाडूंवर बोली लागणार, लखनौ सुपरजायंट, गुजरात टायटन या नवीन संघाच्या बोलीकडे विशेष लक्ष
10.बीजिंग ऑलिम्पिकच्या दरम्यान युक्रेनवर हल्ला करण्याचा रशियाचा कट, अमेरिकेचा गंभीर आरोप, संघर्ष टाळण्यासाठी बायडेन करणार पुतिन यांच्याशी चर्चा