एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 सप्टेंबर 2021 | मंगळवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
- रत्नागिरीतल्या दापोलीत रात्री ढगफुटीसदृश पाऊस, चिपळूणमधल्या जुना बाजार पूल परिसरात अनेक ठिकाणी पाणी, पुन्हा पुराच्या भीतीनं नागरिकांकडून सामानाची हालवाहालव करण्यास सुरुवात
- तळकोकणात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना; आज, उद्या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता
- गणेशोत्सवात निर्बंध वाढण्याचे संकेत, नागपुरात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं पालकमंत्री नितीन राऊतांचं वक्तव्य, चर्चेशिवाय निर्णय न घेण्याचं व्यापाऱ्यांच आवाहन
- राज्यात काल दिवसभरात 3 हजार 626 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5 हजार 988 रुग्ण कोरोनामुक्त
- देशात लसीकरणाचा विक्रम; काल एकाच दिवसात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस तर आतापर्यंत 69.72 कोटी नागरिकांचे लसीकरण
- प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालयानं दाखल करुन न घेतल्यानं महिलेची रुग्णालयाच्या व्हरंड्यात प्रसुती, बाळ दगावलं; नागपुरातली धक्कादायक घटना
- पुनर्विवाहानंतरही विधवेला पतीच्या संपत्तीत अधिकार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं निरीक्षण, रेल्वे पॉईंट्समनच्या मृत्यूनंतर सासू-सूनेनं घेतली होती न्यायालयात धाव
- वरवरा राव यांना तूर्तास दिलासा, प्रकृती अस्वस्थ्यामुळं वैद्यकीय जामीनाची मुदत हायकोर्टानं वाढवली
- हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच, मुंबईतल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य, मुस्लिम वर्चस्वाचा नव्हे तर भारतीय वर्चस्वाचा विचार करण्याचं आवाहन
- ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा; पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताची २-१ अशी आघाडी, रोहित शर्मा ठरला मॅन ऑफ द मॅच
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement