(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 01 जून 2021 मंगळवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 01 जून 2021 मंगळवार | ABP Majha
1. कोरोनाची लाट ओसरतेय; राज्यात सोमवारी 15077 रुग्णांची नोंद, 33 हजार रुग्ण कोरोनामुक्त
2. आजपासून बहुतांश जिल्ह्यात सकाळी 11 ऐवजी दुपारी 2 पर्यंत दुकानं सुरु राहणार, कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या जिल्ह्यांत निर्बंध 'जैसे थे
3. मुंबईत कोरोना निर्बंध शिथील; दुकाने खुली करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला लागू
4. गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा, दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या राज्य सरकारचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
5. बारावीच्या परीक्षेसंदर्भात आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल करणार घोषणा, सूत्रांची माहिती
6. शस्त्रक्रियेनंतर शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, दुपारी 3 वाजता राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांसोबत, तर संध्याकाळी 5 वाजता पक्षातील मंत्र्यांसोबत बैठका
7. राज्य सरकार हेरगिरी करत असल्याचा खासदार संभाजीराजेंचा आरोप, तर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण
8. मोदींविरोधात भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांची मोट बांधण्याचं ममता बॅनर्जींचं आवाहन, सचिवाच्या बदलीवरुन केंद्र सरकारशी वाक्युद्ध सुरुच
9. पाकिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार हामिद मीर यांना भाषा स्वातंत्र्यावर बोलणं महागात, 3 दिवसांसाठी वृत्त निवेदन करण्यास बंदी, जगभरातून निंदा
10. आता घरबसल्या बनवा तुमचं लर्निंग लायसन्स, परिवहन विभागाची नवीन संकल्पना लवकरच