एक्स्प्लोर

नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट! राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांना अटक

नोकरभरतीतील पेपरफुटीचा हा प्रकार एबीपी माझाने उघड केल्यानंतर आता या प्रकरणात अनेक खुलासे होऊ लागले आहेत .

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं आता उघडकीस आलं आहे. या प्रकरणात आता राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांना अटक करण्यात आली आहे. 

आरोग्य विभाग भरतीचा पेपर सेट करण्यात डॉ. महेश बोटले सहभागी होते. त्यांनीच हा पेपर फोडल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, आरोग्य विभागातील भरती प्रकरणात आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात लातूरच्या आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांचाही सहभाग आहे. या पेपरफुटी प्रकरणाचा सर्वात आधी पर्दाफाश एबीपी माझानं केला होता. 

पुणे पोलिसांनी काल या प्रकरणात प्रशांत बडगिरे यांना अटक केली आहे. बडगिरेकडे केलेल्या चौकशीतून आरोग्य विभागाच्या या परिक्षेची प्रश्नपत्रिका तयार होत असतानाच ती फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. ही प्रश्नपत्रिका सहसंचालक डॉ. महेश बोटले यांनी पेपर सेट करतानाच फोडली असा त्यांच्यावर आरोप आहे. महेश बोटले यांनी तो पेपर प्रशांत बडगिरे यांना दिला. त्यानंतर प्रशांत बडगीरे याने तो विकण्यास सुरुवात केली.  बडगीरे याने त्याच्या विभागातील डॉ. संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये तर शाम म्हस्के या कर्मचाऱ्याकडून पाच लाख रुपये घेऊन हा पेपर विकला असा पोलिसांनी आरोप केला आहे.

हा पेपर फुटल्यानंतर राज्यभरातील अॅकॅडमी चालवणाऱ्यांकडे पोहचला.  त्यानंतर अॅकॅडमी चालवणाऱ्यांकडून तो विद्यार्थ्यांना विकण्यास सुरुवात झाली. पुणे सायबर पोलीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणात सहभागी असणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांसह इतर संशयीतांनाही तातडीने अटक केली.  

आतापर्यंत या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली असून आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य विभागाचा हा पेपर फुटल्यानंतर तो राज्यातील अनेक ठिकाणी विकण्यात आला होता.  त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्याच्या इतरही भागातून आणखी काही जणांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ए. बी. पी. माझाने पेपर फुटीचा हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पुणे पोलीसांच्या तपासाला वेग आला आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित बातम्या 

नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट! आरोग्यभरती घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासाला वेग, दोन जणांना अटक

Health Exam Paper Leak : कुंपणानंच शेत खाल्लं! आरोग्य विभागाचा पेपर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच फोडला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget