एक्स्प्लोर

ABP Majha Impact : हलाखीत जगणाऱ्या शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफची उपविभागीय अधिकाऱ्यांकडून दखल; तहसीलदार कार्यालयात हंगामी नोकरी

शहापुर तालुक्यातील धाडसी महीला आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेती हाली बरफ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपासमारीत जगते आहे. काही दिवसांपूर्वी एबीपी माझानं यासंदर्भातील वृत्त प्रसारित केलं होतं. याची दखल घेत भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी तहसीलदार कार्यालय शहापूर येथे तीन महिन्यांच्या हंगामी शिपाई पदावर हाली बरफची नियुक्ती केली आहे.

शहापूर : तालुक्यातील हाली बरफ या महिलेच्या आयुष्यात शौर्य पुरस्कार पटकाविल्यानंतरही अठराविश्व दारिद्र्य आणि अंधार काही संपला नव्हता. लॉकडाऊनमुळे हंगामी स्वरूपात आश्रमशाळेत नोकरी मिळालेली, पण आश्रमशाळा बंद असल्याने तीही गेली. तर शिधावाटप पत्रिकेची ऑनलाईन नोंद नसल्याने तीन महिने धान्य सुध्दा न मिळाल्याने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफवर उपासमारीची वेळ आली.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफची व्यथा मांडणारं वृत्त एबीपी माझानं प्रसारित केलं होतं. एबीपी माझाच्या या बातमीची दखल घेत भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी तहसीलदार कार्यालय शहापूर येथे तीन महिन्यांच्या हंगामी शिपाई पदावर हाली बरफची नियुक्ती केली आहे. नुकतंच नियुक्तीपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला. त्यासोबतच पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करून तिच्या शिधा पत्रिकेची ऑनलाईन नोंदणी होत नाही तोपर्यंत तिला ऑफलाईन धान्य देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी दिले आहेत.

कातकरी या आदिम आदिवासी जमात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजातील हाली बरफ हिने 12 वर्षांची असताना आपल्या मोठ्या बहिणीची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. जंगलात लाकूडफाटा घेण्यासाठी गेली असता वाघाने केलेल्या हल्ल्यातून आपल्या बहिणीचे प्राण तिने वाचविले होते. त्यासाठी तिचा सन्मान राष्ट्रीय पातळीवर 2012मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन करण्यात आला होता. परंतु त्यानंतर अशिक्षित असलेल्या हालीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी सतत दुर्लक्ष केल्याने तिला आपल्या आयुष्यासाठी झगडावे लागले. त्यातून तिला अंत्योदय शिधापत्रिका, घरकुल देण्यात आले. तर उदरनिर्वाहासाठी आदिवासी प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेत शिपाई पदावर हंगामी नेमणूक करून तिला मदत केली होती. परंतु लॉकडाऊनमध्ये आश्रमशाळा मागील एक वर्षांपासून बंद असल्याने तेथील नोकरी तिने गमावली होती. त्यामुळे तिच्यावर पुन्हा एकदा दारिद्र्याचं संकट ओढावलं होतं. यावर उपाय म्हणूनही तीन महिन्यांची हंगामी नोकरी तिला उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्या प्रयत्नातून मिळाल्याने हाली बरफ हिने समाधान व्यक्त केले आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला मदत करणं हे शासनाचे कर्तव्य असून हाली बरफ हिच्या वाट्याला आलेल्या संकटाची माहिती कळताच आपण तिला हंगामी नोकरी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

सरकारी नोकरी, पुरेसं अन्न फक्त आश्वासनांपुरतंच; राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफवर लॉकडाऊन मध्ये उपासमारीची वेळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi  On Marathi Sahitya Sammelan  : 98 व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्तेMaharashtra Portfolio Allocation | महायुतीचंं खातेवाटप जाहीर, कुणाकडं कोणतं खातं? पाहा लिस्ट!Sunil Pal Majha Katta : अपहरणातून मी सुटलो, आता शक्ती कपूर टार्गेट, सुनील पालचे थरारक किस्सेGautami Patil Pune Book Festival | पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलने लावली हजेरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!
Major Reshuffle in the Maharashtra Administration : मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
Embed widget