Abhijeet Patil : धाराशिव साखर कारखान्यावर चौथ्या दिवशीही चौकशी सुरुच, अभिजीत पाटील कारखान्यावर दाखल, सोलापुरातील चौकशी संपली
उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याची चौथ्या दिवशीही आयकर विभागाकडून (Income Tax Department) कसून चौकशी सुरू आहे.
![Abhijeet Patil : धाराशिव साखर कारखान्यावर चौथ्या दिवशीही चौकशी सुरुच, अभिजीत पाटील कारखान्यावर दाखल, सोलापुरातील चौकशी संपली Abhijeet Patil News Income Tax Department continues to investigate Dharashiv Sugar Factory for the fourth day Abhijeet Patil : धाराशिव साखर कारखान्यावर चौथ्या दिवशीही चौकशी सुरुच, अभिजीत पाटील कारखान्यावर दाखल, सोलापुरातील चौकशी संपली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/28/242eb8f1fd31f42a3e07c601b9417a921661674997561339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Abhijeet Patil : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याची चौथ्या दिवशीही आयकर विभागाकडून (Income Tax Department) कसून चौकशी सुरू आहे. धाराशिव साखर कारखान्याचे (Dharashiv Sugar Factory) चेअरमन अभिजीत पाटील (Abhijeet Patil ) यांना सकाळी 11 वाजता आयकर विभागाचे अधिकारी कारखान्यावर घेऊन आले आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. सध्या पंढरपूर, कोल्हापूर, सोलापूर यासह आयकर विभागाच्या सर्व टीम साखर कारखान्यावर सहा गाड्यांच्या ताफ्यासह दाखल झाल्या आहेत. पाटील यांच्यासमोर आयकर विभागाचे अधिकारी कारखान्याच्या कागदपत्राची चौकशी करत आहेत. दरम्यान आज चौकशी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूरमध्ये सुरु असलेली डॉक्टरांची चौकशी संपली
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून आयकर विभागाची चौकशी सुरु आहे. आयकर विभागाची कारवाई अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. कारण धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना कारखान्यावर बोलावण्यात आले आहे. सध्या इतर विभागांची पाच पथकं देखील चोराखळी इथल्या साखर कारखान्यावर आवी आहेत. आज ही कारवाई अंतिम टप्प्यात आली आहे असे समजते. दरम्यान, सोलापूरमध्ये डॉक्टरांची जी चौकशी सुरु होती ती संपली आहे. आता अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्याची तपासणी अंतिम टप्प्यात आली आहे.
अभिजीत पाटील साखर कारखानदारी क्षेत्रातलं मोठं नाव
साखर कारखानदारी क्षेत्रातलं एक मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर गुरुवारी (25 ऑगस्ट) आयकर विभागानं धाडी टाकल्या होत्या. सकाळी साडेसहा वाजल्यापासून त्यांच्या तीन साखर कारखान्यांची तपासणी केली जात होती. पंढरपूरचे मूळ रहिवासी असलेले अभिजीत पाटील हे एक बडं प्रस्थ समजले जाते. पाटील यांनी एकापाठोपाठ एक असे चार साखर कारखाने विकत घेतले आहेत. या ठिकाणीच आयकर विभागाची पथकं दाखल झाली होती. अद्यापही चौकशी सुरु असून, या घटनेनं साखर कारखानदारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अभिजीत पाटील हे युवा उद्योजत आहेत. त्यांनी अल्पावधीच चार साखर कारखाने खरेदी केले आहेत. सध्या त्यांच्या ताब्यात एकूण सहा साखर कारखाने आहे. त्यांच्या उस्मानाबाद, नांदेड आणि नाशिक येथील खासगी साखर कारखान्यावर आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. तसेच पंढरपूरमधील त्यांच्या कार्यालयावरही आयकर विभागानं छापेमारी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)