एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चार वर्षात वारीत चार कोटी लीटर मैल्याची विल्हेवाट, निर्मल वारी उपक्रमास यश
गेल्या चार वर्षात या निर्मल वारी च्या माध्यमातून वारीत चार कोटी लीटर मैल्याची विल्हेवाट लावली असून निर्मल वारी उपक्रमास मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्याचं सदस्य सांगत आहेत.
इंदापूर : पंढरीच्या वारीमध्ये सेवा सहयोग संस्था आणि राज्य शासनाकडून राबविण्यात आलेल्या निर्मल वारी उपक्रमाने अशक्यप्राय असलेली गोष्ट शक्य केली आहे. संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराज या पालखी सोहळ्यात मागील चार वर्षात आतापर्यंत चार कोटी लीटर मैल्याची विल्हेवाट लावली आहे.
वारी म्हटल की लाखो जनसमुदायाचा आनंद सोहळा सेवेची अन् खाण्यापिण्याची रेलचेल. मात्र या सा गोष्टींवर विरझन पडायचे ते वारीतील अस्वच्छतेमुळे वारी पुढील मुक्कामी गेल्यानंतर त्यांची मनोभावी सेवा करणारे हेच ग्रामस्थ जागोजागी उघड्यावर केलेल्या शौचाने दुर्गंधी पसरल्याने नाक मुरडायचे.
या अस्वच्छतेला लगाम लावण्यासाठी शासनाने निर्मल वारीचा उपक्रम राबविला. प्री फॅब्रिकेटेड पध्दतीची आयती स्वच्छतागृहे उभी केली. तरीही काही वारकरी उघड्यावर शौचाला जात होते. त्यामुळे मुकामाच्या ठिकाणी दुर्गंधी पसरतच होती. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजप युवा मोर्च्याच्या सदस्यांना बरोबर घेतले. हे सदस्य गेले चार वर्षांपासून मैल्याची विल्हेवाट लावण्याचे काम करत आहेत.
राज्य शासनाने 2016 साली या उपक्रमासाठी दोन कोटी चार लाख इतका निधी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी मंजूर केला होता. या उपक्रमाला मिळालेल्या यशानंतर 2017 आणि 2018 चाली राज्य शासनाने निर्मल वारीसाठी देण्यात येणाऱ्या निधीतून भरीव वाढ केली होती. स्वच्छतेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि इतर सेवाभावी संस्था या माध्यमातून पालखी मुक्कामी ठिकाणी नियोजन होत आहेत.
गेल्या चार वर्षात या निर्मल वारी च्या माध्यमातून वारीत चार कोटी लीटर मैल्याची विल्हेवाट लावली असून निर्मल वारी उपक्रमास मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्याचं सदस्य आमदार योगेश टिळेकर, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुदर्शन चौधरी आणि संदीप जाधव यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भविष्य
निवडणूक
निवडणूक
Advertisement