एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वर्ध्यात बंद एटीएमची नागरिकांकडून आरती !
वर्धा : वर्ध्यातील सेलूत नोटाबंदीनंतर पैसे काढण्याची मर्यादा वाढली असली, तरी बँक आणि एटीएममध्ये पैसे नसल्यानं लोकांना त्रास सहन करावं लागत आहेत. याविरोधात आज चक्क आरती करत निषेध करण्यात आलं आहे.
नोटाबंदीला पाच महिने झाले असले, तरी रिझर्व्ह बँकेकडून मिळणारी रक्कम कमी असल्याने दिवासातून 24 तास सुरु असणारे एटीएम महिन्याभरात 24 तास चालू राहिलं तर नशीब अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील एटीएम आहे.
जिल्ह्याला महिन्याकाठी सर्व बँकाची परिस्थिती पाहता 600 कोटींची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात मिळणारी रक्कम तर 60 कोटी रुपये म्हणजे गरजेपेक्षा 10 टक्के कमी आहे. एवढ्या पैशात शंभर टक्के ग्राहकांना पैसे मिळणे काठीणच आहे. त्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शिवसेनेच्या कार्यकार्त्यांनी आज बंद एटीएमसमोर आरती करून विरोध दर्शवला. पैशाअभावी बंद एटीएमची लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली.
जिल्ह्यातील 178 एटीएम असताना यातील 90 पेक्षा जास्त एटीएम बंद आहे. जे चालू आहेत, तिथेही गर्दी असल्यानं लगेच एटीएममधून वेळेवर मिळणाऱ्या पैशासाठी तासभर थांबवं लागतं आहे.
पहिलं गावातील कुठलं एटीएम सुरु आहे शोधा, मग पैसे असतील तर रांगेत उभं राहा आणि पैसे काढा अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement