VIDEO Aanvi Kamdar : 300 फूट खोल दरीत पडूनही जिंवत होती, रेस्क्यू टीमने जीवाची बाजी लावली पण...; रीलस्टारच्या मृत्यूचा थरार
Aanvi Kamdar Death : डिजिटल क्रीएटर अन्वी कामदारचे इन्स्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. ती ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईलसंदर्भात व्हिडीओ पोस्ट करायची.
Aanvi Kamdar Death : 300 फूट खोल दरीत पडूनही ती जिंवत होती. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्देवी अंत झाला. रील्स करण्यासाठी ती मित्र-मैत्रिणींसोबत माणगावच्या कुंभे धबधब्यावर गेली होती आणि तिथेच तिचा तोल गेला. पुढे काय घडलं? ती रीलस्टार कोण होती? तिचा मृत्यू नेमका कसा झाला? हे जाणून घेऊया.
रीलस्टार अन्वी कामदार कोण होती? (Who Is Aanvi Kamdar)
स्क्रीनवर दिसणाऱ्या या मुलीचा चेहरा तुम्ही अनेकदा रील्स स्क्रोल करताना पाहिला असेल. हीचं नावय अन्वी कामदार. ती 27 वर्षांची होती. अन्वी डिजिटल क्रीएटर म्हणून ओळखली जायची, मात्र पेशाने ती CA होती. इन्स्टाग्रावर तिचे 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. the glocal journal नावाने तिचं इन्स्टाग्रावर अकाउंट आहे. याच अकाउंटवर ती ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईलसंदर्भात व्हिडीओ पोस्ट करायची. हळूहळू अन्वी नावारुपाला येत होती. देशात परदेशात फिरुन वेगवेगळे व्हिडीओ ती आपल्या अकाउंटवर पोस्ट करत होती. पावसळ्याचा आनंद लुटण्यासाठी नुकतीच ती माणगावच्या कुंभे धबधब्यावर आपल्या 6 ते 7 मित्रांसह गेली होती आणि तिथेच तिला मृत्यूने कवेत घेतलं.
दरीत कोसळल्यानंतरही अन्वी जिंवत होती
आपल्या मित्र मैत्रिणींसह अन्वी 16 जुलैला माणगावात गेली. सकाळी लवकर उठून त्यांनी कुंभे धबधब्यावर जायचं ठरवलं. सकाळी 9 ते 10 वाजल्याच्या सुमारास अन्वी धबधब्यावर पोहचली. यावेळी मुसळधार पाऊस देखील सुरू होता. धबधब्यानजीकच्या एका कड्यावर अन्वी जाण्याचा प्रयत्न करत होती. दाट धुकं, निसरडा रस्ता अन् चालताना अन्वीचा तोल गेला. अन्वी जवळपास 300 फूट खोल दरीत कोसळली.
पुढे काय घडलं असेल हे कल्पना करण्याच्या पलिकडचं आहे. एवढ्या खोल दरीत कोसळून अन्वी जिंवत असेल का? हा प्रश्न तिच्यासोबतच्या मित्रांना सतावत होता. काही वेळातच अन्वीला वाचवण्यासाठी कालाड रेस्क्यू टीम दाखल झाली. अन्वीचा शोध लागला, ती जिंवत होती. रेस्क्यू टीमच्या हाकेला तिला हुंकारा देखील दिला.
अन्वीचा उपचारादरम्यान दुर्देवी अंत
रेस्क्यू टीमने जीवाची बाजी लावून अन्वीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. जवळपास 150 फूट अन्वीला उचलून चालत आण्यात आणलं. नंतर तिला स्ट्रेचरवर ठेवून दरीतून वर खेचण्यात आलं. अन्वीला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमने युद्धपातळीवर काम केलं अन् आपलादेखील जीव पणाला लावाला. अन्वीला तात्काळ हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान अन्वीची प्राणज्योत मालवली.
मागील काही दिवसांपूर्वी भूशी डॅम परिसरात पाच जणांचा पाण्याच्या ओढ्यात मृत्यू झाला होता. कार चालवत रील्स करताना एका महिलेचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी अनेकजण रील्स करतात. स्टंट करत जीवाची बाजी लावतात. रील्सच्या नादात अनेकांनी आपले जीव गमावलेत
ही बातमी वाचा: