एक्स्प्लोर

आदेश भावोजींनी शब्द पाळला, 99 वर्षीय चाहतीची सांगलीत भेट, आजीबाईंचा पैठणी देऊन सन्मान

सांगलीतील 99 वर्षीय चाहतीची आंदेश बांदेकर यांनी भेट घेतली. आदेश भावोजींनी आजीबाईंचा पैठणी देऊन सन्मान केला. वय वर्ष 99 असतानासुद्धा सांगलीच्या नलिनी जोशी यांनी गाण्याची आवड जपली आहे.

सांगली : टीव्हीसमोर होम मिनिस्टर लागल्यावर आदेश बांदेकर यांना पाहून ते समोर असल्याची कल्पना करुन गाणं म्हणणाऱ्या नलिनी जोशी या 99 वर्षीय आजीची आज त्यांनी सांगलीत भेट घेतली. निमित्त होते आजीच्या शंभर वर्षातील पदार्पण कार्यक्रमाचे. यावेळी आदेश बांदेकर यांनासमोर पाहून आजीही अवाक् झाल्या. आदेश बांदेकर यांनी आजींना पैठणी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. 

काही दिवसांपूर्वी आजीच्या गाण्याचा व्हिडीओ पाहून आदेश बांदेकर यांनी त्यांचं कौतुक करण्यासाठी सांगलीला येण्याचं आश्वासन दिलं होतं. वय वर्ष 99 असताना सुद्धा सांगलीच्या नलिनी जोशी यांनी गाण्याची गोडी जपली आहे. नाट्यगीते भक्तिगीते, भावगीते जोशी आजी अतिशय सुरेल आवाजात म्हणून दाखवतात.

या वयातही नाट्यगीत, भक्तिगीत आणि भावगीत सुरेल आवाजात म्हणणाऱ्या आजी संध्याकाळ झाली आणि बांदेकर टीव्हीवर झळकले की गाणं गायला सुरु करतात. जणू काही मागील काही वर्षांपासून त्याचा हा दिनक्रमच बनला आहे. सांगलीतील या आजीबाईंचं अनोखं प्रेम पाहून आदेश बांदेकर यांनी थेट सांगली गाठत त्यांची भेट घेतली. साक्षात आदेश बांदेकर यांना पाहून आजींना आश्चर्य वाटलंच, शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आणि समाधान झळकलं. यावेळी आदेश बांदेकर यांच्या गळ्यात पडून आजीबाईंची आपला आनंद व्यक्त केला.

दरम्यान, सांगलीतील नलिनी जोशी यांनी आज वयाची 99 वर्षे पूर्ण करत 100 व्या वर्षात पदार्पण केलं. या कार्यक्रमाला आदेश बांदेकर यांनी उपस्थिती लावत त्यांना पैठणी भेट देत मनसोक्त गप्पाही मारल्या. यावेळी बोलताना आदेश बांदेकर यांना त्यांच्या आईची आठवण आली आणि या आठवणीने बांदेकर यांचे डोळे पाणावल्याने संपूर्ण वातावरण गहिवरुन गेले.

'झी' मराठीवर 2004 साली होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. या कार्यक्रमाला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत या कार्यक्रमाचे साडेपाच हजार भाग झाले आहेत. आदेश बांदेकर वहिनींना मानाची पैठणी देऊन सन्मान करतात. आता या शोमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नावापासून पैठणीपर्यंत सर्वंच नवीन आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना गृहिणींना 11 लाखांची पैठणी मिळवण्याची संधी आहे. शिवाय कार्यक्रमाचं नाव होम मिनिस्टरऐवजी 'महा मिनिस्टर' आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget