Kolhapur Crime : सव्वा वर्षाच्या बाळाला स्तनपान करून होमगार्डच्या पत्नीने जीवनयात्रा संपवली; कोल्हापूर शहरातील घटना
Kolhapur Crime : पोटच्या अवघ्या सव्वा वर्षाच्या लेकराला स्तनपान केल्यानंतर त्याला झोपवून विवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर शहरातील यादवनगर परिसरात घडली.
Kolhapur Crime : पोटच्या अवघ्या सव्वा वर्षाच्या लेकराला स्तनपान केल्यानंतर त्याला झोपवून विवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर शहरातील यादवनगर परिसरात घडली. शनिवारी ही घटना घडली. निकिता ओंकार येडगे (वय 25 ) असे या विवाहितेचे नाव असून तिचा पती होमगार्ड आहे. अवघ्या सव्वा वर्षाच्या मुलाला स्तनपान करून झोपवल्यानंतर निकीताने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, निकीताच्या माहेरकडील लोकांनी छळातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिल्यानंतर पती ओंकार, सासरे दिलीप बाळू येडगे, दीर विनय आणि सासू अर्चना यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार यादवनगरमध्ये निकिताने घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिताचे माहेर वेसरफ (ता.गगनवाबडा) येथील आहेत. निकिताचा विवाह ओंकार येडगे यांच्याशी पाच वर्षांपूर्वी झाला होता. ओंकार होमगार्ड असून खासगी नोकरीही करत आहे. सकाळी घरातील सर्व लोक बाहेर गेल्यानंतर निकिताने बाळाला स्तनपान करून झोपवल्यानंतर छताच्या लोखंडी पाईपला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. आजी घरी आल्यावर त्यांनी पाहिले असता निकिताने आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने बेशुद्ध निकिताला तत्काळ सीपीआरमध्ये नेले. मात्र. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. निकिताचे नातेवाईक बाजीराव शेळके यांनी तिच्या सासरच्या व्यक्तींकडून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता, त्यामुळे तिने आत्महत्या केल्याची फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
अकिवाटमध्ये तिशीतील जवानाचा अपघाती मृत्यू
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अकीवाटमधील जवान शीतल कोळी (वय 29) यांचे अपघाती निधन झाले. अवघ्या 10 दिवसांपूर्वी जन्मलेल्या लेकराचे तोंड बघून घरी येत असतानाच काळाने घाला घातल्याने संपूर्ण शिरोळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शनिवारी रात्री उशिरा त्यांच्यावर लष्करी इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, भाऊ, विवाहित बहीण, दोन वर्षाचा व 10 दिवसाचा अशी 2 मुले आहेत.
कुरुंदवाड मजरेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर ट्रॅक्टर आणि मोटरसायकलची धडक होऊन गंभीर जखमी झाले. उपचारादम्यान सांगली येथील शासकीय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अकिवाट येथे आणण्यात आले. बेळगावी येथील आर्मी पथकाकडून मानवंदना देऊन लष्करी इतमामात अंत्यविधी करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या