जळगाव कोविड रुग्णालयातून 80 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिला बेपत्ता!
जळगाव मधील कोविड रुग्णालयातून उपचारासाठी दाखल करण्यात आलेली 80 वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे रुग्णालयाचा गलथानपण कारभार समोर आला आहे.
जळगाव : कोविड रुग्णालयाच्या गलथानपणाचे अनेक किस्से आता समोर येऊ लागले आहेत. अशाच प्रकारचा अजून एक किस्सा समोर आला आहे. दोन तारखेपासून उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेली 80 वर्षीय महिला कोविड रुग्णलयातून गायब आहे. या घटनेमुळे कोविड रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. ही वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तिच्यापासून इतरांनाही धोका असल्याने जळगावमध्ये खळबळ माजली आहे.
भुसावल शहरात राहणाऱ्या 80 वर्षीय महिलेचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला जळगाव मधील कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पॉझिटिव्ह असल्याने नातेवाईक घरूनच आजीच्या प्रकृतीची माहिती घेत होते. ज्या दिवशी कोरोनाच्या रुग्णालयात आजीला भरती करण्यात आले त्याच्या दुसऱ्या दिवशी आजीची विचारपूस केली असता आजीला संशयित रुग्णांमध्ये ठेवण्यात आल्याची माहीती नातेवाईकांना मिळाली होती. पॉझिटिव्ह असताना संशयितांमध्ये ठेवण्यात येत असल्याची चूक नातेवाईकांनी रुग्णालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आजीला कोरोनाच्या वॉर्डात भरती करण्यात आल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. कोरोनाच्या वॉर्डात हलविण्यात आल्याचे माहीत झाल्याने आता आजीवर उपचारही वेळेवर होतील आणि अन्य संशयित रुग्णांनाही अडचण येणार नाही म्हणून नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.
Corona India Update | देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 2.46 लाखांवर, 24 तासात 9971 जणांना कोरोना
कोरोना पॉझिजिव्ह महिला गायब दोन दिवसांनी नातेवाईकांनी पुन्हा आजीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात फोन केला असता आजी या ठिकाणी गैरहजर असल्याचे सांगण्यात आले. हे एकून नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकल्याचं पाहायला मिळाले. या घटनेनंतर नातेवाईक आणि रुग्णालयाच्या प्रशासनाने सदर रुग्णाचा तपास केला. मात्र, संपूर्ण रुग्णालयात रुग्ण आढळून न आल्याने नातेवाईकांनी अखेर शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली आहे. मात्र, झाल्या प्रकारातून आजीचं काय झालं असेल शिवाय ती पॉझिटिव्ह असल्याने इतरांचा विचार केला तर पुढे काय होईल? असा गंभीर प्रश्न आता नातेवाईकांच्या पुढे पडला आहे.
Pravin Darekar | रुग्णसंख्या लपवण्याच्या नादात लोकांचा जीव जातोय : प्रवीण दरेकर