6th April Headlines : हनुमान जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम, भाजपचा स्थापना दिवस, RBI पतधोरण जाहीर करणार; आज दिवसभरात
6th April Headlines : राज्यात हनुमान जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, सत्ताधारी भाजपचा आज स्थापना दिवस आहे.
6th April Headlines : आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. राज्यात हनुमान जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, सत्ताधारी भाजपचा आज स्थापना दिवस आहे. RBI पतधोरण जाहीर करणार आहे. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
दिल्ली
– संसदेच्या अर्थ संकल्पिय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. 14 मार्चपासून सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात आदानी आणि राहुल गांधी मुद्यावरून गोंधळामुळे कामकाज होऊ शकलं नाही.
– आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे, संध्याकाळी 6.30 वाजता.
– श्रद्धा वालकर आरोपी आफताब वर आरोप निश्चितीसाठी साकेत कोर्टात सुनावणी होणार आहे.
- भाजपा स्थापना दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेन्द्र मोदी सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेन्द्र मोदी भाजपा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.
अमरावती
- खासदार नवनीत राणा यांच्याकडून सामुहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी हजारो महिलांच्या उपस्थितीत सामुहिक हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे.
मुंबई
- आरबीआयचं पतधोरण आज गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून सकाळी 10 वाजता जाहीर करणार आहेत. 25 बेसिस पॉईंट्सनं रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ होण्याचा अंदाज आहे.
- डॉ. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांकरता रद्द करण्याच्या निकालाला त्यांनी हायकोर्टात आव्हान दिलंय. त्यावर आज सुनावणी होईल. सदावर्तेंनी वकिली पेशाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंसिलनं शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
- जेईई मेन ही परीक्षा पुढे ढकलण्यासह आयआयटीमध्ये प्रवेशास पत्र होण्यासाठी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष शिथिल करावा, अशी मागणी करत वकील आणि सामाजिक कर्यकर्ता अनुभा श्रीवास्तव-सहाय यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच जेईई मेन परीक्षा घेण्याबाबत आणि परीक्षेच्या पात्रता निकषाबाबत केंद्रीय परीक्षा संस्थेनं (एनटीए) 15 डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेलाही याचिकेतून आव्हान दिलेलं आहे, त्या याचिकेवर आज सुनावणी होईल.
- ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणांत हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांसह त्यांच्या सीएनं दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी.
पुणे
- पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे मतदारसंघातील मुलभूत सुविधांसंदर्भातल्या प्रश्नासाठी महापालिकेसमोर उपोषण करणार आहेत. रिपोर्टर - मिकी
नाशिक
मनमाडमधील हनुमान जयंतीच्या निमित्त नांदगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या एकविरा माता यात्रोत्सवात आजपासून प्रारंभ होतो. पाच दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात पारंपारिक प्रथेप्रमाणे बारागाड्या, मल्लखांब, देवीचा मुखडा आणि पालखी मिरवणूक, वीर, आदी पारंपारिक कार्यक्रम होणार आहे.
जळगाव
- हनुमान जयंती निमित्त जामनेर तालुक्यातील रोतवद येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलाय. 20 फूट उंच मूर्तीला मध्यरात्री पासून शेंदूर आणि लोण्याचा लेप लावण्यात येणार आहे.
धुळे
- चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त आज खान्देश कुलस्वामिनी एकवीरा देवीची रथयात्रा शहरातून निघणार आहे. देवीची रथयात्रा पारंपारिक मार्गावरून काढण्यात यावी अशी मागणी मंदिराच्या विश्वस्तांकडून केली जात आहे. मात्र याला पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र आपण पारंपारिक मार्गावरूनच रथयात्रा काढणार असल्याच्या निर्णयावर मंदिर प्रशासन ठाम आहे.
- शहरातील प्राचीन लालबाग हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. मंदिराला आकर्षक सजावट करून उत्सव साजरा केला जातो.
नंदुरबार
- मंत्री विजयकुमार गावित आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी दंगलग्रस्त भागात जाऊन पाहणी करणार आहेत. कायदा सुव्यवस्था संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशीही बैठक घेणार आहेत.
नागपूर
- भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर मध्ये भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
भंडारा
- कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज विविध कार्यक्रमांबरोबर हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
- जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती साजरी होणार आहे. भंडारा शहरातील भृशुंड गणेश मंदिर, तुमसर येथील चांदपूर येथील प्रसिद्ध गणेश मंदिर, सकाळी 10 वाजता.