एक्स्प्लोर
Advertisement
माळेगावच्या यात्रेत श्वानाच्या जोडीला तब्बल 6 लाखांचा भाव!
नांदेड: नांदेडमधल्या माळेगावच्या यात्रेत भरणारा जनावरांचा बाजार चांगलाच प्रसिद्ध आहे. या वर्षी या बाजारात एका श्वानांच्या जोडीची जरा जास्तच चर्चा आहे. संपूर्ण जत्रेत याच श्वानांनी भाव खाल्ला आहे.
काळ्या रंगाचा डौलदार चाल असलेला आणि सिंहाप्रमाणे आयाळ असलेला बर्मन लायन जातीचा श्वान. सिंहाच्या क्रॉसिंग मधून याची उत्पत्ती झाल्यानं याचं नाव बर्मन लायन असं पडलं. तर त्याच्या जोडीला क्रीम कलरची मादी. गुलामिस्ट प्रजातीची. माळेगावाच्या यात्रेत या दोघांना मिळून सहा लाखांची किंमत आली. मात्र फड कुटुंबानं ती फेटाळली आहे.
या दोन्ही श्वानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे दोघंही अजिबात राग खपवून घेत नाहीत. संपूर्ण रात्रभर हे मालकाच्या घराभोवती पहारा देतात. रात्रीला हे अजिबात बसत किंवा झोपत नाहीत.
घराजवळ एखादा उंदीर जरी आला तर त्याच्या फडशा पडेपर्यंत हे शांत बसत नाहीत. अपक्ष आमदार मोहन फड यांनी ही जोडी पुण्यातील एका एजंटकडून तीन वर्षांपूर्वी खरेदी केली. आता त्याला प्रत्येकी तीन लाखांची बोली लावण्यात आली आहे.
माळेगावची यात्र मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेत पशुंचा मोठा बाजार असतो. श्वान, गाढव, उंट, घोडे, ससे, कबुतर असे अनेक पशूपक्षी इथं विक्रीसाठी येतात. पण यंदा ही श्वानाची जोडी सर्वांचं आकर्षण ठरली आहे.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement