एक्स्प्लोर
'अमेझिंग महाराष्ट्र'... महाराष्ट्र दिनानिमित्त ‘माझा’ची प्रेक्षकांना खास भेट!

मुंबई: महाराष्ट्राचा आज 57वा वर्धापन दिन... महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जंगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच एबीपी माझावरही दिवसभर ‘अमेझिंग महाराष्ट्र’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 1960साली महाराष्ट्र आणि गुजरात हे द्विभाषिक राज्य होतं. परंतु कालांतराने स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी जोर धरु लागली. यात अनेकांनी मुंबईसह महाराष्ट्रची मागणी केली. परंतु मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करुन गुजरातमध्ये सामील करण्याची मागणी मोरारजी देसाई यांनी केली. परंतु या मागणीला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा यासाठी मोठा संघर्षही झाला. या संघर्षात सर्वात मोठा वाटा हा गिरणी कामगारांचा होता. या संघर्षानंतर १ मे, १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. एबीपी माझाच्या ‘अमेझिंग महाराष्ट्र’ या विशेष कार्यक्रमात अद्भुत, अथांग, विराट आणि अविस्मरणीय असा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा























