एक्स्प्लोर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येला पाच वर्षे पूर्ण

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला तब्बल 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यात विविध ठिकाणी मोर्चांचं आयोजन करण्यात आलं आहे. दोनच दिवसांपूर्वी दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. याशिवाय आधीच सीबीआयच्या अटकेत असलेला वीरेंद्र तावडे हाच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला आहे. सचिन अंदुरेला अटक नालासोपाऱ्यातील स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. स्फोटक प्रकरणात वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या तिघांना अटक करण्यात आली. यातील शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. काल सचिन अंदुरेला पुण्यातील कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. सचिन अंदुरे कोण आहे? सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता.  निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे. “वीरेंद्र तावडेच दाभोलकरांच्या हत्येचा मास्टरमाईंड” 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर ज्या दोन मारेकऱ्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या, त्यातील एक सचिन अंदुरे आहे. हा संपूर्ण कट अगोदरच अटकेत असलेल्या वीरेंद्रसिंह तावडे याने रचला आहे. त्यामुळे सचिन अंदुरेची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असा अर्ज सीबीआयने कोर्टात केला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सचिन अंदुरेची कोठडी मिळवण्यासाठी सीबीआयने सादर केलेल्या रिमांडमध्ये संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याचं म्हटलंय. जवाब दो कॅम्पेन अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि राज्यभरातील विवेकवादी लोकांकडून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप डीपी यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सराकरला जाब विचारला जात आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे सूत्रधार कधी गजाआड होणार, असा सवाल करत सोशल मीडियावरुन ‘जवाब दो’ कॅम्पेन चालवले जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget