एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात कॉटन कंपनीच्या आगीत पाच जणांचा मृत्यू
पुणे : तळेगाव-चाकण रोडवर कॉटन कंपनीत आग, पाच जणांचा मृत्यू
पुण्यात तळेगाव-चाकण रस्त्यावर खराबवाडीत आरोग्य दवाखान्याजवळ एका कॉटन कंपनीला मोठी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. चार महिला आणि एका पुरुषाचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचं काम सुरु आहे.
--------------------
पीएमपीएमएलच्या बसला भीषण आग
पुण्यात वारजे माळवाडी परिसरात पीएमपीएमएलच्या बसला भीषण आग लागली. सुदैवानं या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर वेळीच धाव घेत नियंत्रण मिळवल्याने पुढील दुर्घटना टळली.
सीएनजीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वारजेहून निघालेली ही बस चिंचवडच्या दिशेनं जात होती. आग लागल्याचं कळताच ड्रायव्हरनं बस बाजूला घेतली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
--------------------
मुंबईत कचऱ्याला लागलेली आग आटोक्यात
कांदिवलीतल्या लालजीपाडा येथील कचऱ्याला लागलेली आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलानं 10 मिनिटात या आगीवर नियंत्रण मिळवलं. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. के. डी. कम्पाऊंडमधील केबल आणि प्लास्टिकला ही आग लागली.
--------------------
औरंगाबादच्या शेंद्रा भागात दोन कंपन्यांना भीषण आग
औरंगाबादेत शेंद्रा भागातील दोन कंपन्यांना मध्यरात्री भीषण आग लागली. यामध्ये दोन्ही कंपन्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास आदित्य इंटरप्रायजेस आणि व्हिनस कंपनी या दोन कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र या भीषण आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
--------------------
सांगलीत प्लायवूडच्या कारखान्यात आग
सांगलीतल्या एमआयडीसीमधील प्लायवूडच्या कारखान्याला पहाटेच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. कुपवाड एमआयडीसी, सांगली आणि मिरज अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. प्लायवूडला आग लागल्यानं ही आग चांगलीच भडकली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement