एक्स्प्लोर
सोलापुरात महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी पाचजण भाजले, दोघे गंभीर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील हन्नूर गावात मृत महिलेच्या चितेला अग्नी देताना पाच जण भाजले आहेत. काल संध्याकाळी ही घटना घडली असून भाजलेल्यांमधील दोघांची प्रकृती गंभीर आहे. सोलापूरातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात काल एका महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी पाच जण आगीत भाजले आहेत. भाजलेल्या सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. विश्वनाथ बाळशंकर, रमेश बाळशंकर, सलीम मुल्ला, महादेव थोर आणि अनंता बनसोडे अशी जखमींची नावं आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
निवडणूक























