एक्स्प्लोर

पालघर जिल्ह्याची चिंता वाढली, डहाणूत चार नवीन रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 17 वर

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात 17 रुग्ण झाल्याने आरोग्य विभागासाठी आणि प्रशासकीय यंत्रणांसाठी डोकेदुखी वाढणार आहे.

पालघर : पालघर जिल्हा ग्रामीण साठी चिंता वाढविणारी बाब पुन्हा समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा आकडा वाढत आहे. पण काल रात्री आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. डहाणू तालुक्यातील चार नागरिकांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पालघर तालुक्यातील काटाळे या गावी वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका कुटुंबातील तीन वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली होती. मात्र त्या मुलीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा व येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. काटाळे येथील वीट भट्टीवर पाच नवीन रुग्ण आढळले असून कासा येथील उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना (इंटरन्स) कोरोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आता वीटभट्टीवर असणाऱ्या आणखी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 17 वर पोचली आहे डहाणू येथे लहान मुलीला करोनाची लागण झाल्याने पालघर तालुक्यातील काटाळे, लोवरे, वांदिवली-खरशेत या गावांच्या हद्दी बंद करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये आरोग्य सेवकांच्या मार्फत घरोघरी पाहणी सुरू करण्यात आली होती. दरम्यान कासा येथील उपविभागीय रुग्णालय सील करण्यात आले होते. जिल्ह्यातील 197 नागरिकांचे नव्याने विलगीकरण हे चार ही रुग्ण डहाणू तालुक्यातील रानशेत गावातील आहेत. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 17 रुग्ण झाल्याने आरोग्य विभागासाठी प्रशासकीय यंत्रणांसाठी डोकेदुखी वाढणार आहे. या नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील 197 नागरिकांचे नव्याने विलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक जिल्हा वैद्यकीय अधिकारी  डॉ सागर पाटील यांनी दिली आहे.
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: मुंबईतील टायगर ग्रुपच्या अध्यक्षाला पोलिसांचा दणका, अंधेरीमधील खासगी प्लॉट कब्जा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील टायगर ग्रुपच्या अध्यक्षाला पोलिसांचा दणका, अंधेरीमधील खासगी प्लॉट कब्जा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Rain : महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
Mumbai High Court On Tukaram Mundhe FDA: हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?
हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Embed widget