एक्स्प्लोर
बंदुकीच्या धाकावर चार किलो सोनं लुटलं, घटना सीसीटीव्हीत कैद
नालासोपारा : नालासोपाऱ्यात बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी चार किलो सोनं लुटलं. नालासोपारा-वसई लिंक रोडवर असलेल्या मार्टिन कॉम्पेक्समधील नक्षत्र ज्लेलर्समध्ये ही लूट करण्यात आली.
तोंडाला रुमाल बांधून आलेल्या या दरोडेखोरांनी दुकानमालकाला बंदुकीचा धाक दाखवून एका बाजूला नेलं आणि दुकानाची लूट केली. हे सर्व दरोडेखोर दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. मात्र रुमालामुळे त्यांचा चेहरा झाकलेला असल्याने त्यांची ओळख पटवण्यास अडचणी येत आहे.
दरम्यान या प्रकरणी तुळींच पोलिस दरोडोखोरांचा शोध घेत आहेत. मात्र भरचौकात घडलेल्या दरोड्याच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वीच एका व्यापाऱ्याला भर रस्त्यात गोळ्याघालून लूटण्यात आलं होतं. आता पुन्हा झालेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे वसई-विरारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement