एक्स्प्लोर

847 उत्तर भारतीयांना घेऊन नाशिकहून लखनौसाठी विशेष ट्रेन रवाना

847 उत्तर भारतीयांना घेऊन नाशिकरोड रेल्वे स्थानकाहुन सकाळी साडे दहा वाजता ही ट्रेन निघाली. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हिरवी झेंडी दाखवून उत्तर भारतीयांना निरोप दिला.

नाशिक : नाशिकहून काल भोपाळला पहिली विशेष रेल्वे रवाना झाल्यानंतर आज उत्तरप्रदेशला  दुसरी विशेष ट्रेन रवाना झाली आहे. आज 847 उत्तर भारतीयांना घेऊन नाशिकरोड रेल्वे स्थानकाहुन सकाळी साडे दहावाजता ट्रेन निघाली. ही ट्रेन लखनौसाठी रवाना झाली.  जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हिरवी झेंडी दाखवून उत्तर भारतीयांना निरोप दिला. यावेळी सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या तसेच 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. ही ट्रेन कालच नाशिकहून रवाना होणार होती. मात्र काही कारणास्तव उत्तरप्रदेश सरकारकडून मनाई करण्यात आल्याने काल ही ट्रेन स्थगित करुन आज रवाना करण्यात आली. केंद्र सरकारने देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर मध्य रेल्वेने काल नाशिकमधून भोपाळसाठी रात्री 9.30 वाजता विशेष रेल्वेगाडी सोडली होती. लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक लवकरच स्वगृही परतण्यास सुरुवात झाली आहे. राज्यांच्या विनंतीवरून कामगारांसाठी रेल्वेकडून काल, शुक्रवारी देशभरात काही विशेष गाड्या चालवण्यात आल्या. लवकरच ज्या लोकांना आपल्या राज्यात परतण्याची इच्छा आहे अशांसाठी देखील परतीचा मार्ग मोकळा होणार आहे. देशात 40 दिवसांनंतर शुक्रवारी पहिली रेल्वे चालवण्यात आली. 1200 कामगारांना घेऊन जाणारी विषेश ट्रेन झारखंडमधील हटिया येथे पोहोचली. हैदराबादजवळील लिंगमपल्ली येथून ही विशेष गाडी सोडण्यात आली होती. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन या वेळी करण्यात आलं. या ट्रेनमधील सर्व कामगारांची जिल्ह्यातील कार्यालयात तपासणी होणार आहे. यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वॉरन्टाईन करण्यात येणार आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर लोक लवकरच स्वगृही परतणार आहेत. या सर्वांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी कामगार दिनापासून “श्रमिक विशेष” रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा अडकलेल्या लोकांना पाठवणे किंवा स्वगृही आणण्यासाठी प्रोटोकॉलनुसार संबंधित दोन्ही राज्य सरकारच्या विनंतीनुसार या विशेष गाड्या चालवल्या जातील. या श्रमिक स्पेशलच्या समन्वय आणि सुरळीत कारभारासाठी रेल्वे आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. स्वगृही पाठवताना काय काळजी घेतली जाणार? प्रत्येक राज्याने प्रवाशांना पाठवण्याअगोदर त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. जे निरोगी प्रवासी आहेत, अशानांच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. सोबतचं या प्रवाशांच्या तुकड्या करुन पाठवण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी चालवण्यात येणाऱ्या रेल्वे आणि बस गाड्या सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घालणे बंधनकारक असेल. प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय प्रारंभीच्या स्टेशनवर पाठविणार्‍या राज्यांद्वारे करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaBJP Melava Navi Mumbai : अमित शाह यांच्या बैठकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनवले बोगस आयडीABP Majha Headlines :  2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Embed widget