एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वर्धा : राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गाडीतून साडे तीन लाखांची रोकड जप्त
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार सुधीर कोठारी यांच्या गाडीतून 3 लाख 36 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. या रकमेत सर्व जुन्या पाचशेच्या नोटा आहेत. पोलिसांनी रात्री दीड वाजता नाकाबंदीदरम्यान ही कारवाई केली.
कारवाई चालू असताना सुधीर कोठारी यांनी पोलिसांसमक्ष गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपवलं आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
राज्यातील 147 नगरपालिका, 18 नगर पंचायतींसाठी मतदान सुरु
दरम्यान नोटांचा वापर हा निवडणुकीत वाटण्यासाठी होत असल्याचं बोललं जातं आहे. पण रक्कम गाडीत सापडल्याने गुन्हा दाखल झालेला नाही. सर्व रक्कम पोलिसांच्या ताब्यात आहे. राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा पहिला टप्पा होत आहे. यामध्ये 147 नगरपालिका आणि 18 नगर पंचायतींसाठी मतदान होत आहे. गैरप्रकार होऊ नये यासाठी राज्यभर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement