एक्स्प्लोर

2nd March Headlines : दहावीची आजपासून परीक्षा, पोटनिवडणुकीची मतमोजणी, सत्तासंघर्षाची निर्णायक सुनावणी; आज दिवसभरात

2nd March Headlines :  आजपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. तर, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे.

2nd March Headlines :  आजपासून महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने पावले उचलली असून भरारी पथके नियुक्त केली आहेत. विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी आहे. तर, सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्ष प्रकरणी सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे. 

तीन राज्यात विधानसभा निवडणूक मतमोजणी

मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी रोजी 88 टक्के मतदान झाले होते. तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. नागालँडमध्ये 84 टक्के तर मेघालयमध्ये 76 टक्के मतदान झाले होते. आज तिन्ही राज्यात मतमोजणी होणार आहे. या राज्यात सत्तांतर होणार की सत्ताधारी पक्ष कायम राहणार,

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज पुन्हा एकदा विधान भवनात सत्ताधारी आक्रमक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या आक्रमकतेला कसं उत्तर द्यायचं यासाठी महाविकास आघाडी रणनीति आखणार आहे. विधिमंडळाची हक्कभंग समिती स्थापन झाली असून संजय राऊत यांना नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. 

महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक

-  महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईतील सीसीआय येथे बैठक होणार आहे.  महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना बैठकीसाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अजित पवार उपस्थित राहणार. बैठकीत अधिवेशनातील पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. 
 

आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू 

आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू होणार आहे. राज्यात 15,77,256 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. राज्यातील 5033 परीक्षा केंद्रावर ही बोर्ड परीक्षा होणार आहे. बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी विशेष अभियान राज्यभरात राबविले जात आहेत.

 

मुंबई

- राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यांच्या विविध मागण्यांबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे.
- खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी दंडाधिकारी कोर्टात आज सुनावणी. कोर्टात राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात कोर्टात सतत गैरहजर राहिल्यानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. 
- पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांनी सीबीआयच्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. 
- पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी.

छत्रपती संभाजीनगर 

-  गॅस दरवाढ, इंधन दरवाढी विरोधात शहर जिल्हा कॉंग्रेसकडून आंदोलन

 
जालना

- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर जिल्हा दौऱ्यावर आहेत.


वर्धा 

- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शिवगर्जना अभियान आज वर्धा येथे होणार आहे. खासदार अरविंद सावंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 

- स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे, यासाठी 21 फेब्रुवारी ते 5 मार्च सिंदखेडराजा ते नागपूर विदर्भ राज्य निर्माण यात्रा वामनराव चटप यांच्या नेतृत्वात सुरू आहे. ही यात्रा सकाळी हिंगणघाट शहरात येणार आहे.

 

अकोला 

- शिवसंवाद यात्रेनिमित्त सुषमा अंधारे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जिल्ह्यात पाच सभा होणार आहेत.
 

यवतमाळ

 - शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे याची संजय राठोड याच्या बालेकिल्ला मध्ये जाहीर शिवगर्जना सभा होणार आहे.

- विद्या चव्हाण प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी महाराष्ट्र यांची जनजागार यात्रा यवतमाळ येथे येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget