एक्स्प्लोर

29 April In History: भारताचे 'एडिसन' डॉ. शंकर भिसे यांचा जन्म, अभिनेता इरफान खान यांचा स्मृतीदिन; आज इतिहासात

29 April In History: महान भारतीय चित्रकार रवी वर्मा यांचा आज जन्मदिवस आहे. त्याशिवाय, भारताचे 'एडिसन' डॉ. शंकर भिसे यांचाही जन्मदिवस आहे. तर, अभिनेते इरफान खान यांचे निधन आजच्या दिवशी झाले होते. 

29 April In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व आहे.  29 एप्रिलचे ही महत्त्व आहे. या दिवशीदेखील काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आहे. तर, महान भारतीय चित्रकार रवी वर्मा यांचा आज जन्मदिवस आहे. त्याशिवाय, भारताचे 'एडिसन' डॉ. शंकर भिसे यांचाही जन्मदिवस आहे. तर, अभिनेते इरफान खान यांचे निधन आजच्या दिवशी झाले होते. 

आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस International Dance Day

दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर यांचा हा जन्मदिवस आहे.  त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जावा असे आंतरराष्ट्रीय नाट्यसंस्था (International Theatre Institute-ITI) ने ठरवले. ही संस्था युनेस्कोची भागीदार असलेली स्वतंत्र संस्था आहे. 1982 पासून हा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा केला जातो. 

1848 : चित्रकार राजा रवि वर्मा यांचा जन्म 

राजा रवि वर्मा हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार होते. रवि वर्मा यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाश्चात्त्य कलेतील वास्तववादी तंत्र आणि तैलरंगाचे माध्यम वापरून भारतीय महाकाव्यांतील प्रसंग आणि धार्मिक विषय रंगविले. या त्यांच्या तजेलदार आणि अभिनव आविष्कारमुळे त्यांना भारतीय तैलरंगचित्रणाचे आद्य जनक मानले जाते. कलेच्या क्षेत्रात राजा रविवर्मांना मिळालेली मान्यता तसेच त्यांची प्रतिभा आणि कार्य बघून सातवे एडवर्ड यांनी‘कैसर-इ-हिंद’हे सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला. 

1867: भारताचे 'एडिसन' शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म 

डॉ. शंकर आबाजी भिसे हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. 1897 मध्ये ' इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड' नामक मासिकाने 'स्वयंमापन यंत्र' करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करून देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती. पुढे त्यांनी शंकर आबाजी भिसे यांनी 200 हून अधिक निरनिराळे शोध लावले आणि त्यातील 40 हून अधिक संशोधनांची पेटंट घेतली. सौरऊर्जेवर चालणाऱ्या कार तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.

1891 : भारतीदासन, कवी यांचा जन्म

1891- भारतीदासन हे 20 व्या शतकातील तमिळ कवी आणि बुद्धिवादी लेखक होते. सुब्रह्मण्य भारतींच्या प्रभावळीतील एक अग्रगण्य तमिळ कवी. त्यांनी तमिळमध्ये काव्य (भावगीते, कथाकाव्ये आणि पद्यनाट्ये), नाटक, कादंबरी, पटकथा इ. प्रकारांत लेखन केले.

1980: चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचे निधन

रहस्यपटांतील व मानसशास्त्रीय भयपटांतील नावीन्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळखले जाणारे ब्रिटीश चित्रपट दिग्दर्शक-निर्माते आल्फ्रेड हिचकॉक यांचे निधन. ब्रिटनमधील  मूकपटांमधील व बोलपटांमधील यशस्वी कारकिर्दीनंतर हिचकॉक अमेरिकेतील हॉलिवूड चित्रपटसृष्टीत गेले. आपल्या पाच दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये हिचकॉक यांनी स्वत: ची एक वेगळी छाप सोडली होती. कॅमेरा कलाकाराच्या नजरेचा वेध घेईल अशा प्रकारे कॅमेरा वापरण्याची एक नवीन पद्धत अस्तित्वात आणली. 

2020 : अभिनेते इरफान खान यांचे निधन

आपल्या खास अभिनय शैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारे अभिनेते इरफान खान यांचे निधन आजच्या दिवशी झाले. ते कर्करोगाने आजारी होते. छोटा पडद्यापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर चित्रपटांमध्ये लहान आकाराच्या भूमिकेतही त्यांनी अभिनयाची छाप सोडली होती. बॉलिवूडमधील चित्रपटात त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांनी हॉलिवूडच्या चित्रपटात काम केले होते. स्लमडॉग मिलेनिअर, ज्युरासिक पार्क, 'लाईफ ऑफ पाय' या चित्रपटातील भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या.

इतर महत्त्वाच्या घडामोडी 

1933: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.

1945: मुसोलिनी ठार झाल्यानंतर दुसऱ्या महायुद्धात इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.

1970: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू आंद्रे आगासी यांचा जन्म.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Embed widget