(Source: Poll of Polls)
24th July Headline: विधिमंडळ आणि संसदेचे अधिवेशन, इर्शाळवाडीमध्ये बचाव कार्य थांबवलं; आज दिवसभरात
24th July Headline: विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा असून विरोधक आजही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार असण्याची शक्यता आहे.
24th July Headline: आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होतेोय. विरोधक 293 च्या प्रस्तावात शेतकऱ्यांच झालेल नुकसान, त्याचसोबत विकास कामांना सरकारने दिलेली स्थगिती यावर चर्चा होणार आहे. यासह आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे,
इर्शाळवाडी दुर्घटना बचाव कार्य थांबले
बुधवारी, 19 जुलै रात्रीच्या सुमारास इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेचं बचाव कार्य आजपासून थांबवण्यात येणार आहे. चार दिवसाच्या बचाव कार्यानंतर आता हे काम थांबवत असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एकूण 228 लोकसंख्या असलेल्या गावात 27 जणांचा मृत्यू झालाय तर 57 जण अद्याप बेपत्ता आहेत. आतापर्यंत 143 जणांना जिवंत बाहेर करण्यात यश आलय. दोन कुटूंब पूर्ण मयत आहेत. सरकारकडून वाचलेल्या ग्रामस्थांची तात्पुरत्या स्वरूपात कंटेनरमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या कंटनेरची अवस्था वाईट असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणण आहे. सरकार सिडकोच्या माध्यमातून ग्रामस्थाचं कायमस्वरूपी पुनर्वसन करणार आहे.
विधिमंडळ अधिवेशन
आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होतोय. विरोधक 293 च्या प्रस्तावात शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्याचसोबत विकास कामांना सरकारने दिलेली स्थगिती यावर चर्चा होणार आहे. ही चर्चा होत असताना विरोधक सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून अधिकारी झालेल्या दर्शना पवार या तरुणीचा खून झाला. राज्यात दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी, महिला बेपत्ता होण्याचे आणि एकतर्फी प्रेमातून महिलांवर वाढलेले हल्ले या विषयावरून विरोधक सत्ताधारी पक्षाला घेण्याचा प्रयत्न करतील. यासोबतच दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना शासनाने तात्काळ कडक शिक्षा करण्याची मागणी लावून धरतील.
अनेक विभागांच्या पुरवणी मागण्यावरती ही चर्चा होणार आहे. खरं तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्वाधिक पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
विधानपरिषद
विधानपरिषदेत मराठवाड्यात अद्याप पेरणी योग्य पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. या विषयावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 93 अन्वये सूचनांचे निवेदन सादर करतील. या निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी विरोधी पक्ष लावून धरणार आहेत.
इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले होते. यावरून राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. याप्रकरणी सरकारने काय कारवाई केली हा सवाल विरोधी पक्षाकडून प्रामुख्याने उपस्थित होईल.
राज्यात लवकरच गणेश उत्सव येणार आहे. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसबाबत कुठल्याही प्रकारचं राज्य सरकारने धोरण जाहीर केलं नाही. सध्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालण्याच्या विचारात सरकार असल्यामुळे मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
संसदेच्या अधिवेशनाचा तिसरा दिवस
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज सुद्धा संसदेच्या दोन्ही सभागृहात मणिपूरच्या मुद्यावर गोंधळ होण्याची शक्यता आहे. राजस्थान, पश्चिम बंगला आणि छत्तीसगड मध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात भाजप खासदार गांधी पुतळ्यासमोर आंदेलन करणार आहेत, सकाळी 9.30 वाजता. तर इंडिया आघाडीचे नेते आज राज्यसभा विरोधी पक्ष नेत्याच्या दालनात बैठक करणार आहेत.
मान्सून अपडेट
राज्यात पुढील पाच दिवस कोकण आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. कोकणात पावसाचा जोर तुलनेनं कमी झाला असला तरी गंभीर इशारे देण्यात आलेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला. मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर कमी होणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट देण्यात आलाय. पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
अमरावती
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक आहे. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार बच्चू कडू यांच्या गटात थेट लढत असेल.
आजच्या सुनावणी
खासदार संजय राऊत यांच्याविरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या याचिकेवर आज शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टात सुनावणी होईल. संजय राऊत यांनी सामना पेपरमध्ये चुकीची बातमी छापून मेधा सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मात्र या बातमीचे स्रोत काय?, असा सवाल कोर्टानं संजय राऊत यांना विचारला आहे.
रस्त्यावरील मॅनहोल्सची झाकणं चोरणाऱ्यांवर रितसर गुन्हा का दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानं दिल्यानंतर पालिका आणि पोलीस प्रशासन या मुद्द्यावर आता अँक्शन मोडमध्ये आले आहेत. मान्सून दरम्यान पाणी भरलेलं असताना मॅनहोल्सची कामं करण कठीण असल्यातं पालिकेनं गेल्या सुनावणीत हायकोर्टात सांगितलं आहे. मात्र या समस्येवर उपाययोजना सुरू असल्याची हायकोर्टात ग्वाही पालिकेनं दिली आहे. यासंदर्भाताल जनहित याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होईल.
DHFL प्रकरणातील आरोपी वाधवान पितापुत्रांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होईल.