एक्स्प्लोर

24 December In History : आज भारतीय ग्राहक दिन, साने गुरुजी, मोहम्मद रफींचा जन्मदिवस; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...

24 December In History : आज भारतीय ग्राहक दिन आहे. महान व्यक्तिमत्व असलेले साने गुरुजी, मोहम्मद रफी यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला.  

On This Day In History :  आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. आज म्हणजे 24 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. यात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आज भारतीय ग्राहक दिन आहे. महान व्यक्तिमत्व असलेले साने गुरुजी, मोहम्मद रफी यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला.  आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

1524 : वास्को द गामा यांचा मृत्यू 

वास्को द गामा  हा एक पोर्तुगीज खलाशी होता. वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्यांनी 1498  मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला.

1910 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा
आजच्याच दिवशी 24 डिसेंबर 1910 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. अंदमान आणि निकोबार या बेटसमूहाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरमध्ये सेल्यूलर जेल आहे. इथेच 50 वर्षं कारावासाची सावरकरांना शिक्षा सुनावण्यात आली होती, आणि इथेच त्यांनी अनेक यातनाही सोसाव्या लागल्या होत्या. माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवर लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले.  

1986 : भारतीय ग्राहक दिन. National Consumer Rights Day 
National Consumer Rights Day : ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा, यासाठी विविध संघटना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करतात. यासाठीच  24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन (National Consumer Rights Day) म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी 24  डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. 1986 साली 24  डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, म्हणणे मांडण्याचा हक्क
तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क,  ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार हे सहा हक्क मिळाले आहेत.

1999: तालिबानी अतिरेक्यांकडून इंडियन एअरलाइन्स फ्लाईट 814चं अपहरण

काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या 'इंडियन एअरलाइन्स फ्लाईट 814' या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले. 178 प्रवाशांनी भरलेलं हे विमान अतिरेक्यांनी हायजॅक केलं आणि लाहोर, दुबईमार्गे कंदाहारला नेलं. या प्रवाशांना सोडवण्यासाठी तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारला तीन अतिरेकी मौलाना मसूद अजहर, मुश्ताक अहमद जरगर आणि अहमद उमर सईद शेख यांना सोडावं लागलं होतं. 

 विश्वनाथ आनंद यांनी बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियनशिप 
2000: भारतीय बुद्धीबळ खेळाडू विश्वनाथ आनंद म्हणजेच ग्रॅंडमास्टर. विश्वनाथ आनंद यांनी आजच्या दिवशी 2000 साली बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली. त्यांनी यानंतर अनेक विक्रम आपल्या नावावर केले. 
 
2014 : अटल बिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली.
 
2016 :   छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईनजीक निर्मित होत असलेल्या अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. 
  
1899 :  साने गुरुजींचा जन्म (Sane Guruji Birth Anniversary) 
महाराष्ट्राच्या साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील एक आदरार्थी नाव म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजींचं नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 1899 साली झाला होता. त्यांचे 'श्यामची आई' हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. त्यांचा मृत्यू 11 जून 1950 रोजी झाला.  

1924 : मोहम्मद रफी यांचा जन्म (Mohammed Rafi Birth Anniversary)

Mohammed Rafi Birth Anniversary : मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील कोटला सुल्तान सिंह गावात झाला. एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या या अवलियाने पुढे जाऊन भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या सुरेल आवाजाने साऱ्यांनाच मोहात पाडले. लाहोरमध्ये उस्ताद वाहिद खान यांच्याकडून रफींनी संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर गुलाम अली खान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. वयाच्या 13 व्या वर्षी रफींनी पहिल्यांदा जाहीर व्यासपीठावर गाणं गायलं आणि यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या संगीतकार श्याम सुंदर यांना त्यांचं गाणं आवडलं. श्याम सुंदर यांनी रफींना मुंबईत बोलावलं. त्यानंतर 'सोनिये नी हिरीये नी' हे पहिलं गाणं रफींनी 'गुल बलोच' या पंजाबी सिनेमासाठी गायलं.1944 साली नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 'हिन्दुस्तान के हम है पहले आप के लिए गाया' हे पहिलं हिंदी गाणं गायलं आणि नंतर असंख्य गाण्यांमधून आपल्या आवाजातली जादू त्यांनी दाखवून दिली. घरात तशी संगीताची आवड नव्हती, परंतु मुलाचा संगीताकडे कल बघून, वडिलांनी किराणा घराण्याच्या वहीद खान, फिरोझ निझामी यांच्याकडे धाडला आणि त्यांच्याकडून रफींना संगीताची थोडीफार तालीम मिळाली. हिंदी सिनेसृष्टीतील गायकांपैकी सर्वश्रेष्ठ गायकांच्या यादीत मोहम्मद रफींचं नाव घेतलं जातं. संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला. या पुरस्कारांपेक्षा त्यांना अपेक्षित असलेला रसिकवर्ग त्यांना मोठ्या संख्येने लाभला. 31 जुलै 1980 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आवाजाच्या जादूगाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र आवाजाच्या रुपातून रफी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. 

1956 : अभिनेते अनिल कपूर यांचा जन्म (Anil Kapoor Birthday)

भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध  आणि सदाबहार अभिनेते अनिल कपूर यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला. आजही त्यांचं व्यक्तिमत्व एखाद्या तरुणाला लाजवेल असंच आहेत. त्यांनी बॉलिवूडसह हॉलिवूड सिनेमांमध्येही आपलं आणि देशाचं नाव झळकावलं आहे. 

1973: पेरीयार ई. व्ही. रामस्वामी  यांचा मृत्यू

स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरीयार ई. व्ही. रामसामी  यांचा मृत्यू आजच्या दिवशी झालेला. पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी हे विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक होते. त्यांनी समाजातील अस्पृश्य, पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला. पेरियार एकमेव असे क्रांतीकारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधून ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडूच्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवले. पेरियार यांनी तत्कालीन मद्रास प्रांतात जस्टीस पार्टीची स्थापना केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget