एक्स्प्लोर

23 March In History : शहीद स्मृती दिन; आजच्याच दिवशी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली

23 March In History : भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा 'शहीद दिन' म्हणून मानला जातो.

23 March In History : स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह (Bhagat Singh), राजगुरु (Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) यांची नावे ऐकल्यावर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा एक चेहरा येतो. भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा 'शहीद दिन' म्हणून मानला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव ही नावे त्यात अग्रणी आहेत. इंग्रजी सरकारच्या 'पब्लिक सेफ्टी बिल अ‍ॅन्ड ट्रेड डिस्ट्रिब्यूशन बिल' च्या विरोधात भगतसिंहांनी सेट्रंल असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडला होता. त्यावेळी त्यांनी स्वत: ला पोलिसांच्या हवाली केलं. लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकारी सॉन्डर्सला गोळ्या घातल्या. नंतर या प्रकरणाचा ठपका ठेऊन भगतसिंहावर खटला चालवण्यात आला. या प्रकरणात भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याची अंमलबजावणी 1931 साली करण्यात आली. त्यांना 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी फाशी देण्यात आली होती. हाच दिवस देशात शहीद दिन म्हणून मानला जातो. 

1910: डॉ. राम मनोहर लोहिया यांची जयंती  (Rammanohar Lohiya)

राम मनोहर लोहिया यांचा जन्म 23 मार्च 1910 रोजी अकबरपूर येथे झाला. त्यांचे वडील हिरालाल हे व्यवसायाने शिक्षक आणि खरे देशभक्त होते. राम मनोहर लोहिया यांनी स्वातंत्र्यापूर्वीच देशाच्या राजकारणात भविष्यातील बदलाचे वारे आणले होते. त्यांचे वडील गांधीजींचे अनुयायी होते. राम मनोहर लोहिया यांना त्यांच्या प्रखर देशभक्ती आणि प्रखर समाजवादी विचारांमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये तसेच त्यांच्या विरोधकांमध्ये प्रचंड आदर मिळाला. देशाच्या राजकारणात, स्वातंत्र्य चळवळीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतर, स्वतःहून राज्यकारभाराचा दृष्टिकोन बदलणारे अनेक नेते होते, त्यापैकी एक म्हणजे राम मनोहर लोहिया. राम मनोहर लोहिया यांच्या म्हणण्यानुसार, राजकारणाचा अर्थ आणि मुख्य उद्दिष्ट जनतेसाठी काम करणं आहे. ज्या राजकारणाने लोकांना भाकरी मिळत नाही, पोट भरत नाही, ते राजकारण म्हणजे भ्रष्ट आणि पापी राजकारण आहे.

1880: भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या बसंती देवी यांची जयंती.

1956: या दिवशी पाकिस्तान हा पहिला इस्लामिक प्रजासत्ताक देश बनला.

1987: अभिनेत्री कंगना रणावत हीचा जन्मदिन.

1996: तैवानमध्ये प्रथमच थेट राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली. ज्यामध्ये ली टेंग हुई अध्यक्ष बनले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
Embed widget