एक्स्प्लोर

रस्त्यांचं अपूर्ण बांधकाम मुळावर, राज्यात 24 तासात अपघाताचे 23 बळी

रस्त्याच्या अपूर्ण बांधकामामुळे पुणे-नाशिक मार्गावर एसटीचा भीषण अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. राज्यात गेल्या 24 तासात विविध अपघातांमध्ये 23 जणांचा जीव गेला आहे.

पुणे : पुण्यातील नारायणगावजवळ एसटी आणि टेम्पोच्या धडकेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे या दुर्घटनेचमागचं प्रमुख कारण रस्त्यांचं अपूर्ण बांधकाम काम हेच आहे. पुणे-नाशिक काल मध्यरात्री महामार्गावर त्र्यंबकेश्वर-पुणे या एसटीला ही दुर्घटना घडली. दुसरी गोष्ट म्हणजे रस्ते अपूर्ण असले तरी या ठिकाणांहून टोलची वसुली मात्र पूर्णपणे आणि बिनचूक केली जाते.  आधी खड्डे आणि त्यानंतर आता अपूर्ण रस्ते लोकांच्या जीवावर बेतत असल्याने लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पुणे-सातारा महामार्ग हा काळा डाग आहे, अशी कबुली कालच खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिली होती. त्याच्या काही तासातच म्हणजे काल पुण्याजवळच्या शिंदेवाडीत एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही. मात्र या घटनेला 12 तासही होत नाहीत, तोच पुन्हा अपघात होऊन 11 लोकांनी जीव गमावला आहे. पुण्याबरोबरच नाशिक जिल्ह्यात झालेल्या दोन अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.  येवला- मनमाड रस्त्यावर काल संध्याकाळी झालेल्या तिहेरी अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. येवल्याच्या बाभूळगाव शिवारात क्रूझर गाडीचं टायर फुटून ती आधी समोरुन येणाऱ्या मारुती ओम्नीवर आणि नंतर मागून येणाऱ्या बसवर आदळली. क्रूझरमधील लोक सारखपुड्याचा कार्यक्रम आटोपून आपल्या गावी म्हणजे धुळ्याकडे परतत होते. दुसरीकडे आज पहाटे मनमाड-मालेगाव जवळ अक्टिव्हा गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. ज्यात प्रसिद्ध कांदा व्यापारी इंदर चोपडा यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे कर्मचारी संजय ठुबे यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget