एक्स्प्लोर
लोणावळ्यात तरुण-तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला
लोणावळा : लोणावळ्यात महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते.
दोघांचेही हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते, तर शरीरावर जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे दोघांचीही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. लोणावळा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, यासाठी सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. हजारो विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
मृत तरुण अहमदनगरचा आहे, तर तरुणी पुण्यातील आहे. दोघेही रविवारपासून बेपत्ता होते. मात्र दोघांचा मृतदेह लोणावळ्यात आढळून आल्याने एकच खळबळ माजली. दरम्यान दोघे लोणावळ्यात कशासाठी आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement