एक्स्प्लोर
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना पालिकेचं दिवाळी गिफ्ट
ठाणे : दिवाळीच्या तोंडावर ठाणे महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना दिवाळी गिफ्ट मिळालं आहे. महापालिकेनं कंत्राटी सफाई कामगारांचा पगार 22 हजार रुपये केला आहे.
ठाणे महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना आतापर्यंत तुटपुंजा पगार देण्यात येत होता. पालिकेनं आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सफाई कामगारांना 22 हजारांचं वेतन देण्यात येईल. आज झालेल्या बैठकीत कंत्राटी सफाई कामगारांचं मूळ वेतन 11 हजार 500 रुपये ठरवण्यात आलं आहे. त्यात टीए आणि डीएसह एकूण पगार 22 हजार होणार आहे. तसंच 2015 पासूनचे अॅरिअर्सही देण्यात येणार आहेत.
ठाणे महापालिकेच्या या निर्णयाचा फायदा जवळपास 11 हजार सफाई कामगारांना मिळणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सफाई कर्मचाऱ्यांना पालिकेनं हे गिफ्ट दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement