एक्स्प्लोर
जन्मदात्या आईकडून मुलीचं 6 वर्षात 6 वेळा लग्न, आरोपी आईसह एकास अटक
भंडारा : लाखनी तालुक्यात जन्मदात्या आईनंच 21 वर्षीय मुलीचं 6 वर्षात तब्बल 6 वेळा लग्न लावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या आईसह तिच्या एका साथीदाराला अटक केली आहे.
पीडित मुलगी 16 वर्षांची असताना आरोपी आईनं तिचं लग्न लावलं. पण सहा महिन्यानंतर मुलीला घटस्फोट घेऊन दिला, आणि मुलीचं दुसरं लग्न लावलं. त्यानंतर मुलीचं उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीशी तिसरं लग्न लावून दिलं. विशेष म्हणजे, यावेळी पीडित मुलीच्या पदरात 1 महिन्यांची मुलगी असतानाही तिच्या आईनं तिचं पुन्हा लग्न लावलं.
सहा वर्षात तिच्या आईने अशाप्रकारे तब्बल 6 वेळा मुलीचं लग्न लावून दिलं. अखेर या त्रासाल कंटाळून सातव्यांदा लग्न लावण्याआधीच मुलीनं घरातून पळ काढला. आणि पोलिसात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी आईसह तिच्या एका साथीदाराला अटक केली.
दरम्यान, 21 वर्षांच्या या मुलीचे गुजरातमधीलही एका व्यक्तीशी लग्न लावून दिलं होतं. यावेळी दीड लाखात तिची विक्री झाल्याची माहिती नंतर पीडित मुलीला मिळाली. पण तरीही कोवळ्या मनावर होणारे शारीरिक आणि मानसिक आघात ती पीडित मुलगी सहन करीत होती. अखेर सातव्या लग्नापूर्वी तिने हिंमत करुन आपल्याच आई विरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
Advertisement