एक्स्प्लोर

21 November In History : संयुक्त महाराष्ट्र चळवळीला सुरुवात, भारत-चीन युद्धाला पूर्णविराम; आज इतिहासात...

Today in History : आज म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील पहिले 15 आंदोलक आजच्या दिवशी हुतात्मा झाले.

On This Day : आज म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांनी ग्रामोफोनचा शोध लावला. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी संयुक्त महाराष्ट्रासाठी पुकारलेल्या शांततामय आंदोलनावर तत्कालीन मुंबई सरकारने लाठीमार करत गोळीबार केला. यामध्ये 15 आंदोलकांनी प्राण गमावले. 


1877: ग्रामोफोनचा शोध लागला

1877 मध्ये थॉमस एडिसन यांनी जगातील पहिला फोनोग्राफ बनवला. या फोनोग्राफमध्ये आवाज रेकॉर्ड करून आणि नंतर एकला जाऊ शकत होता. हा एक अपघाती शोध होता. एडिसन हे टेलिग्राफ आणि टेलिफोनशी संबंधित शोध लावत होते. कागदाच्या टेपवर संदेश रेकॉर्ड करण्यासाठी आणि नंतर ते टेलीग्राफद्वारे पाठवण्यासाठी ते एक मशीन बनवत होते. याचदरम्यान, त्यांना त्यांचाच रेकॉर्ड केलेला आवाज पुन्हा ऐकू आला. एडिसनने "मेरी हॅड अ लिटल लँब" कविता गात रेकॉर्ड केली आणि पुन्हा ऐकली. फोनोग्राफ नंतर ग्रामोफोन म्हणून ओळखला जाऊ लागला.

1926: नायक आणि खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेमनाथ यांचा जन्म

अभिनेता प्रेमनाथ यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1926 रोजी पेशावर येथे झाला. प्रेमनाथ हे बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. जवळपास 250 चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्रेमनाथ यांनी 'जॉनी मेरा नाम', 'धर्मात्मा', 'बरसात', 'कालीचरण', 'प्राण जाए पर वचन न जाए', 'बॉबी' आणि 'लोफर' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1985 मध्ये आलेला 'हम दोनों' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. 3 नोव्हेंबर 1992 रोजी प्रेमनाथ यांचे निधन झाले.

1927 : नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म

शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. डोंबिवलीत झालेल्या 2003 सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. कायम पडद्यामागे काम करणाऱ्या नाट्यकर्मींसाठी त्यांनी नाट्यसंमेलनातच 75 हजार रुपयांचा धनादेश दिला होता.


1955 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 15 आंदोलक हुतात्मा झाले

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या शेवटच्या टप्प्यात आंदोलने, सभा व मोर्चे सुरू झाले होते. तरीही भारत सरकारने या चळवळीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत होते. या चळवळीला मोरारजी देसाई, स. का. पाटील यांनी प्रथमपासून विरोध केल्याचे दिसून येत होता. परंतु जनतेच्या रेट्याने हे आंदोलन यशस्वी करण्यात आले. काँग्रेस वर्कींग कमिटीने त्रिराज्य योजना मांडली. याला संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र विरोध सुरू झाला. 18 नोव्हेंबर 1955 रोजी मुख्यमंत्री मोरारजी देसाई त्रिराज्य योजना मंजुरीसाठी विधानसभेत मांडणार होते. त्या विरोधात सेनापती बापट यांनी प्रचंड मोठा मोर्चा विधानसभेवर काढला. त्याच दिवशी सायंकाळी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी 50,000 हजार लोकांची सभा मुंबईत कामगार मैदानात घेतली व त्रिराज्य कल्पना फेटाळली व 21 नोव्हेंबर 1955 रोजी मोरारजी देसाई व स. का. पाटील यांनी मुंबईच्या चौपाटीवर सभा घेतली व त्यावेळी लोकांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या. परंतु मोरारजी देसाई यांनी 'हिंसक मार्गांचा वापर केल्यास मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे सांगितले. स. का. पाटील यांनी 'आकाशात चंद्र तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रालाही मिळणार नाही' अशी घोषणा केली. परिणामी चप्पल, दगड, गोटे यांचा मारा करून त्यांची ही सभा लोकांनी उधळून लावली. 21 नोव्हेंबर 1955 रोजी आंदोलकांनी कामगारांचा संप घडवून आणला. लोक ओव्हल मैदानावर जमू लागले. पोलीस बंदोबस्त कडक होता. मोरारजी देसाई सरकारने जमावबंदी आदेश मांडला. आदेशभंग केल्याबद्दल पोलिसांनी प्रथम लाठीमार केला. अश्रूधूर सोडला. नंतर जमावावर गोळीबार केला. त्यात 15 आंदोलक हुतात्मा झाले व सुमारे 300 लोक जखमी झाले. 400 पेक्षा जास्त लोकांना अटक झाली. (संदर्भ: आजचा महाराष्ट्र, एम.ए भाग -1, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)   

1962: भारत-चीन युद्धाला पूर्णविराम 

20 ऑक्टोबर 1962 रोजी भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरू झाले. चीनने भारतीय भूभागावर कब्जा केल्याच्या दाव्यानंतर दोन्ही देशांचे लष्कर आमनेसामने आले होते. महिनाभर चाललेल्या या युद्धात भारताच्या 11-12 हजार सैनिकांचा मुकाबला करण्यासाठी चीनने 80 हजारांहून अधिक सैनिक उतरवले होते. पूर्ण महिन्यानंतर, 20 नोव्हेंबर रोजी चीनने युद्धविराम घोषित केला. तसेच वादग्रस्त भागातून माघार घेण्याचे मान्य केले. यानंतर 21 नोव्हेंबर 1962 रोजी युद्ध संपले. या युद्धात भारताचे 1 हजार 383 जवान शहीद झाले. तर 722 चिनी सैनिक मारले गेले.

इतर महत्त्वाच्या घटना : 

1694: फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्टेर यांचा जन्म
1942: राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
1962: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.
1963: प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन.
1970: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन. 
2015: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget