एक्स्प्लोर
घाटकोपर बॉम्बस्फोटाचा आरोपी 16 वर्षांनी औरंगाबादमध्ये सापडला!
आरोपी अब्दुल रहमान शेख त्याच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी 5 ऑगस्टला औरंगाबादमध्ये आला होता.
औरंगाबाद : मुंबईत घाटकोपर इथे 2002 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपीला औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. तब्बल 16 वर्षांनंतर आरोपीला जेरबंद करण्यात आलं. गुजरात एटीएस पथकाने स्थानिक एटीएसच्या सहाय्याने मंगळवारी ही कारवाई केली. अब्दुल रहमान खान असं या आरोपीचं नाव आहे.
आरोपी अब्दुल रहमान शेख त्याच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी 5 ऑगस्टला औरंगाबादमध्ये आला होता. त्याच्या पत्नीवर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनंतर एटीएस पथकाने औरंगाबादच्या कैसर कॉलनीत सापळा रचून अब्दुल रहमान शेखला बेड्या ठोकल्या.
अब्दुल शेखचं वय 43 वर्ष आहे. तो 2002 पासून सौदी अरेबियात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. गुजरात एटीएसचं पथक त्याला मुंबई क्राईम ब्रान्चच्या ताब्यात देणार आहे.
बसमध्ये बॉम्बस्फोट
घाटकोपर इथे 2 डिसेंबर 2002 रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बेस्ट डेपोमधील एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 32 नागरिक, महिला आणि मुलं जखमी झाले होते. बॉम्बस्फोटमुळे बेस्टसह सार्वजनिक मालमत्तेचं जवळपास 5 लाख 33 हजार रुपयांचं नुकसान झालं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement