एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra flood : अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश
कोल्हापूर व सांगलीत पुरामध्ये अडकलेल्या आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.
सांगली/कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीत पुरामध्ये अडकलेल्या आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.
शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून केंद्र शासनाकडून मदत घेण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे राज्य शासनाच्या संपर्कात असून केंद्राकडून लागेल ती मदत करण्यासाठी सूचना दिल्या असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
कोल्हापूर व सांगलीमध्ये जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांसह महसूल, जलसंपदा, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसह इतर सर्व विभागांचे कर्मचारी व अधिकारी अहोरात्र पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून राबत आहेत. स्थानिक प्रशासनाबरोबरच ओदिशा, पंजाब आणि गुजरात राज्यातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 22 तसेच नौदलाच्या 26, तटरक्षक दलाची 11 (सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 )पथके, सैन्यदलाची 8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची तीन (सांगलीमध्ये दोन तर कोल्हापुरात एक) पथके कार्यरत आहेत. तसेच कोल्हापुरात 76 तर सांगलीमध्ये 90 बोटींद्वारे बचाव कार्य सुरु आहे.
पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासनाने केंद्र शासनाशी तत्काळ संपर्क साधल्यामुळे सैन्य दलाची व तटरक्षक दलाची पथके कार्यरत झाली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाबरोबर मदतीसंदर्भात संपर्कात आहेत.
सध्या कर्नाटकातील आलमट्टी धरणातून आज दुपारपर्यंत 4 लाख 50 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे कोल्हापुरातील पाणी पातळी कालपेक्षा कमी झाली आहे. तसेच सांगलीतील पाणी पातळी स्थिर आहे. पाऊस कमी झाल्यानंतर या ठिकाणची पाणीपातळी आणखी कमी होण्यास मदत होईल.
पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाने 154 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यातून ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रतिकुटुंब 10 हजार तर शहरी भागातील प्रतिकुटुंब 15 हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. ही मदत तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 239 गावे, सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 90 गावे अशी 12 तालुक्यांतील 329 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. पुरामुळे बाधित गावातील दोन लाख 52 हजार जणांना बचाव पथकांनी सुरक्षितस्थळी हलविले असून 270 ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील सांगलवाडी व हरिपूर येथे एनडीआरएफ व एसडीआरएफची टीम बचाव कार्य करत आहे. सांगलवाडीत 20 ते 22 बोटींद्वारे बचावकार्य सुरु आहे. एअरलिफ्टिंगने नागरिकांना हलविण्यात येत आहे. हरिपूरमध्येही बोटीतून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मिरज, पलूस व वाळवा तालुक्यातही प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि औषधोपचाराची सोय केली आहे. याबरोबरच जनावरांच्या बचावासाठीही प्रयत्न सुरु आहेत. कवलापूर येथे तीन हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement