19 December Headlines : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात, महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ पंढरपूर बंद, आज दिवसभरात
19 December Headlines : राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुर होणार आहे. लोकायुक्त कायद्याचं बील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
![19 December Headlines : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात, महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ पंढरपूर बंद, आज दिवसभरात 19 december headline Winter Assembly Session pandhrpur bandh marathi news 19 December Headlines : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात, महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ पंढरपूर बंद, आज दिवसभरात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/19/b688a65cdb73ff641bdd2caf6981c70b1671388501247328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
19 December Headlines : राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुर होणार आहे. लोकायुक्त कायद्याचं बील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज पंढरपूर बंद असणार आहे. तेसच रिक्षा चालक मालकांचे पुण्यात आंदोलन होणार आहे.
राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार
राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुर होणार आहे. लोकायुक्त कायद्याचं बील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची बैठक
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सहा मोर्चे निघणार
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सहा मोर्चे निघणार आहेत. त्यामध्ये धनगर समाजाचा मोर्चा, विदर्भ जन आंदोलन समितीचा मोर्चा तसेच आशा गटप्रवर्तकांचा मोर्चा महत्त्वाचा ठरणार आहे.
महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज पंढरपूर बंद
महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज पंढरपूर बंद असणार. आजा मार्गशीर्ष वद्य एकादशी असून या बंद मुळे भाविकांचे हाल होण्याची शक्यता आहे.
जालन्यात होमिओपॅथी डॉक्टर्स अँड विद्यार्थ्यांचा मोर्चा
अंबड चौफुली ते कलेक्टर ऑफिस होमिओपॅथी डॉक्टर्स अँड स्टुडंट्स असोसिएशन पायी मोर्चा काढणार आहेत. सी एच ओ पदभरती प्रक्रियात होमिओपॅथिक डॉक्टरांना समाविष्ट करत नाही तोपर्यंत भरती प्रक्रियाला स्थगिती देण्यासंदर्भात जिल्हाभरातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या वतीने आज सकाळी 11वाजता होमिओपॅथिक डॉक्टर्स अँड स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने अंबड चौफुली ते कलेक्टर ऑफिस पायी मोर्चा काढणार आहेत.
एकीकरण समितीचा बेळगावात महामेळावा
आज एकीकरण समितीचा बेळगावात महामेळावा होणार आहे. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सोमवारपासुन सुरु होत आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आलय.कर्नाटक सरकारने मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश देणार नसल्याच जाहीर केलय.
रिक्षा चालक मालकांचे पुण्यात आंदोलन
टू व्हिलर प्रवासी वाहतूकीच्या विरोधात कौन्सिल हॉल येथे रिक्षा चालक मालकांचे सकाळी 11.30 वाजता आंदोलन होणार आहे.
श्मी शुक्ला यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी
फोन टैपिंग प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठा रश्मी शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. रश्मी शुक्लांविरोधात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे निर्दोश.
नवी मुंबईतील पार्किंगच्या समस्येवर हायकोर्टात सुनावणी
नवी मुंबईतील पार्किंगच्या समस्येवर हायकोर्टात सुनावणी होईल. आरटीआय कार्यकर्ता संदीप ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)