17 February Headlines : सत्ता संघर्ष सुनावणीतील महत्त्वाचा निकाल, राज्यपाल कोश्यारी यांना निरोप, CM शिंदे आणि संजय राऊत कोकण दौऱ्यावर; आज दिवसभरात
17 February Headlines : सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत महत्त्वाचा निकाल जाहीर होणार आहे. यासह आज दिवसभरात काही महत्वाच्या घटना घडणार आहेत. याचा थोडक्यात आढावा...
17 February Headlines : सत्ता संघर्षावर आज सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. नबाम रेबिया निकाल पुनर्विचारासाठी सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवले जाईल का, यावर घटनापीठ आज निकाल देणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण सुरू ठेवावे, अशी शिंदे गटाची विनंती आहे. तर, सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण पाठवावे, अशी ठाकरे गटाची विनंती आहे. त्याबाबत आज निकाल जाहीर होणार आहे. त्याशिवाय जाणून घ्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...
ठाणे
- जितेंद्र आव्हाड आणि महेश आहेर यांच्या वादाच्या प्रकरणात चार जणांना अटक झाली आहे. अटकेत असलेल्यांना पुन्हा एकदा आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे.
मुंबई
- नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस आज मुंबईत दाखल होणार आहेत. तर मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंडसाठी निघणार आहेत.
- खासदार नवनीत राणा यांच्या वडिलांना दिलासा मिळणार की फरार घोषित करण्यात येणार? मुंबई सत्र न्यायालय आज निकाल देणार आहे.
रत्नागिरी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर असणार आहेत.
- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत.
सिंधुदुर्ग
- खासदार संजय राऊत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणार आहेत. कणकवली येथील जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत.
पुणे
- महाविकास आघाडीचे कसब्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी रोहित पवार, धीरज देशमुख, इम्रान प्रतापगढी इत्यादींच्या उपस्थित कसबा गणपतीपासून बाईक रॅली निघणार आहे.
- एमपीएससीची परिक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसार व्हावी, नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू व्हावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून अलका चौकात आंदोलन करण्यात येणार
नागपूर
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. शाह रात्री नागपूरला पोहचणार आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची काटोल मतदारसंघात सभा. या सभेत अनिल देशमुख यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी उपस्थित राहणार आहेत.
- युथ एम्पॉवरमेंट समिट मध्ये उद्घाटन सोहळ्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहे
- भाजपच्या नागपूर महानगर कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे
कोल्हापूर
- अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार असून हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात असणार आहेत.
सांगली
- इस्लामपूर मध्ये आज बिझनेस फोरम तर्फे 'आईबीएफ एक्सपो' या व्यावसायिक प्रदर्शनाचे उद्घाटन.
हिंगोली
- आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरत असते. मागील दोन-तीन वर्ष कोरोनामुळे ही यात्रा झाली नाही. यावर्षी कोणत्याही निर्बंधाशिवाय ही यात्रा भरणार आहे.
भंडारा
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. बैठकांसह विविध कार्यक्रमांना उपस्थित रहाणार आहेत.