Mumbai-Goa cruise : कॉर्डिलिया क्रूजवरील आणखी 143 जणांना कोरोनाची लागण, बाधितांची संख्या 209 वर
कॉर्डिलिया क्रूज (Cordelia cruise ship) 30 डिसेंबर रोजी मुंबईहून गोव्याला निघाले होते. परंतु, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारनं परवानगी नाकारली होती.
मुंबई : कॉर्डिलिया क्रूजवरील (Cordelia cruise ship) आणखी 143 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या आधी 66 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. 1 हजार 827 जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्यातील 143 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यामुळे कॉर्डिलिया क्रूजवरील प्रवाशांमधील आतापर्यंत 209 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
30 डिसेंबर रोजी कॉर्डिलिया क्रूज मुंबईहून गोव्याला निघाले होते. परंतु, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारनं परवानगी नाकारली होती. कॉर्डिलिया क्रूजवरील सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
143 of 1,827 passengers on board Cordelia cruise ship test COVID-19 positive in Mumbai in addition to 66 others already infected: BMC
— Press Trust of India (@PTI_News) January 5, 2022
कॉर्डेलिया क्रूझवरील प्रवासी करोनाच्या संसर्गामुळे रविवारी रात्रीपासून क्रूझवरच अडकले आहेत. कूझवरील क्रू मधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने गोवा सरकारने क्रूझवरील प्रवाशांना चाचणीशिवाय उतरण्यास नकार दिला होता. कॉर्डेलिया हे क्रूझ जहाज मुंबईहून गोव्याला निघाले होते.
राज्यात कोरोनाचा धुमाकूळ
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईतही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासांत 15 हजार 166 नव्या रुग्णाची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी अगदी शंभरीच्या घरात गेलेल्या मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा सध्या 15 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर राज्यात काल तब्बल 18 हजार 466 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
महत्वाच्य बातम्या
- PM Modi Punjab Rally : सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती, दौरा रद्द करण्याचा पंतप्नधानांचा निर्णय अंतिम क्षणी; चरणजीत सिंह चन्नींची पहिली प्रतिक्रिया
- PM Modi Punjab Rally : सुरक्षेतील त्रुटींमुळे पंजाबमधील मोदींची रॅली रद्द, पंतप्रधान दिल्लीकडे परतले
- Smruti Irani : पंजाबच्या पवित्र भूमीत काँग्रेसचे खुनी इरादे, स्मृती इराणींचा हल्लाबोल, मोदींचा ताफा रोखल्याने भाजप आक्रमक