एक्स्प्लोर

13th June In History: साहित्यिक, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आचार्य अत्रे, गझल सम्राट मेहदी हसन यांचे निधन; आज इतिहास

13th June In History: आजचा दिवस सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. आचार्य अत्रे यांचे निधन आजच्या दिवशी झाले. तर, कम्युनिस्ट नेते ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांचा आज जन्मदिवस...

13th June In History: आजचा दिवस सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. साहित्य, चित्रपट, पत्रकारिता, सामाजिक-राजकीय लढे यामध्ये मोलाचे योगदान देणारे प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार, सर्वांचे लाडके आचार्य अत्रे यांचे निधन आजच्या दिवशी झाले. जगभरात क्रांतीची लाट सुरू असताना भारतात लोकशाही मार्गाने स्थापन झालेल्या कम्युनिस्ट सरकारचे पहिले मुख्यमंत्री ई.एम. एस. नंबुद्रीपाद यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. तर, गझल सम्राट मेहदी हसन यांचे निधन आजच्या दिवशी झाले. 


1909 :  ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ई.एम.एस नंबुद्रीपाद यांचा जन्म

 भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील प्रमुख नेते, विचारवंत आणि केरळचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले ई. एम. नंबुद्रीपाद यांचा आज जन्मदिवस. लोकशाही मार्गाने स्थापन झालेल्या कम्युनिस्ट सरकारचे ते पहिले मुख्यमंत्री होते. डाव्या चळवळीत ईएमएस या नावाने ते परिचित आहेत. ईएमएस यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. त्याशिवाय त्यांनी केरळमधील जातीय प्रथांविरोधातही आंदोलने उभी केली. त्यांच्या नेतृत्वात कम्युनिस्ट पक्षाचे केरळमध्ये सरकार आल्यानंतर त्यांनी जमीन सुधारणा घडवून आणत जमिनीचे फेरवाटप केले. शैक्षणिक सुधारणाही घडवून आणल्या. हे निर्णय म्हणजे आधुनिक, सामाजिक निर्देशांकात केरळला अग्रसेर करण्यासाठीचा पाया होता. ईएमएस हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे अनेक वर्ष सदस्य होते. त्याशिवाय, त्यांनी पक्षाच्या महासचिवपदाची धुराही सांभाळली. 


1969: थोर साहित्यिक, पत्रकार, नाटककार आचार्य अत्रे यांचे निधन

मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते  प्रल्हाद केशव अत्रे यांचा आज स्मृतीदिन. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्रे यांचे घणाघाती भाषण आणि दैनिक मराठामधील धारदार लेख, बातम्या यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीला हत्तीचे बळ मिळाले. 

पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले. अत्रे यांनी 1928  मध्ये लंडन विद्यापीठातून टी.डी. (शिक्षक पदविका) केले. भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी सिरिल बर्ट यांच्या हाताखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि हॅरो येथे अध्यापन केले.   पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत 18 वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यावेळी त्यांना फक्त 35 रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला.

आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. अशी बायको हवी, उद्याचा संसार, एकच प्याला-विडंबन, कवडीचुंबक, तो मी नव्हेच, मोरूची मावशी आदी नाटके चांगलीच गाजली. तर, गीतगंगा,  झेंडूची फुले ही काव्य संग्रहदेखील प्रसिद्ध झाली. आचार्य अत्रे यांनी केशवकुमार या नावाने लिखाण केले. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला. 

आचार्य अत्रे यांनी पत्रकारिता क्षेत्रातही भरीव योगदान दिले.   जानेवारी 1940 साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. त्याआधी त्यांनी काही मासिकेही काढली होती. नवयुग साप्ताहित  जुलै 1962  पर्यंत ते चालू होते. जून 1947 रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले. परंतु ते वर्षभरच चालले.  15 नोव्हेंबर 1956  रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. 21 जानेवारी 1940 ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरू केले. त्यावेळी अत्रे काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे काँग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती.

आचार्य अत्रे यांनी चित्रपट क्षेत्रातही आपले योगदान दिले. अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स' मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. 1940 साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 

1934 साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी 1937 साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. 1938  साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रॅंडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.

आचार्य अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला 1954  साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते. आचार्य अत्रे यांनी महान क्रांतिकारी समाजसुधारक महात्मा फुले यांच्या जीवना आधारीत 'महात्मा फुले' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 

1967 : विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन. 

विनायक पांडुरंग करमरकर ऊर्फ नानासाहेब करमरकर हे प्रसिद्ध शिल्पकार होते. मुंबईच्या ‘सर जे. जी. कला विद्यालय’ येथे ते शिल्पकला शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने करमरकरांना 1962 साली ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन गौरवले.


1997: दिल्लीतील उपहारगृहाला आग

दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत 59 जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे 100 जण जखमी झाले. या अग्निकांडातील पीडितांना न्याय मिळवण्यासाठी अनेक वर्ष न्यायालयीन लढा द्यावा लागला होता. 

2012: पाकिस्तानी गझल गायक मेहदी हसन यांचे निधन

आपल्या जादूई आवाजाने मेहदी हसन यांनी पाकिस्तानसह भारत आणि जगभरातील संगीतप्रेमींच्या मनात स्थान निर्माण केले होते. "गझलसम्राट" म्हणून ते प्रसिद्ध आहे. 1979 मध्ये भारत सरकारने त्यांना के. एल. सेहगल संगीत शहेनशहा पुरस्कार दिला होता. लता मंगेशकर यांनाही मेहंदीच्या आवाजातील गाणी "ईश्वरी आवाजासारखी" वाटत असत. 

गझल गायनाला जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय हसन यांना जाते. त्याच्या सुरेल नमुने आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने रागांची अखंडता राखण्यासाठी तो अद्वितीय आहे.

कलावंत संगीतकारांच्या कुटुंबात जन्मलेल्या हसन यांचा लहानपणापासूनच संगीताकडे कल होता. त्यांनी जगजीत सिंग ते परवेझ मेहदीपर्यंत विविध शैलीतील गायकांच्या पिढ्यांवर प्रभाव टाकला. त्यांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांसाठी गायन केले. कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल, हसन यांना पाकिस्तान सरकारने निशान-ए-इम्तियाज, तमघा-ए-इम्तियाज, प्राईड ऑफ परफॉर्मन्स आणि हिलाल-ए-इम्तियाजने सन्मानित केले.

इतर महत्त्वाच्या घटना: 

1879 : हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म

1923: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचा जन्म

1934: व्हेनिसमध्ये अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट

1965: भारतीय क्रिकेटपटू मनिंदर सिंग यांचा जन्म

1978: इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gyanesh Kumar New Election Commissioner Of India :  ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special ReportJayant Patil BJP? : जयंत पाटलांच्या मनात चाललंय तरी काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.