Tipeshwar Wildlife Sanctuary : अलौकिक! टिपेश्वर अभयारण्यात एकाच दिवशी 10 वाघांचे दर्शन, बछड्यांसह मोठ्या वाघांचाही समावेश
Yawatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात वाघांचे दर्शन होतच असते, आता पुन्हा एकदा पर्यटकांना जवळपास 10 वाघ फिरताना दिसले आहेत.
Tipeshwar Wildlife Sanctuary : यवतमाळ जिल्हा (Yawatmal District) पूर्वीपासून अलौकिक वनसंपदेने नटलेला आहे. बऱ्याच अभयारण्यांसह (Wildlife Sanctuary) विविध प्राण्यांच्या उपस्थितीमुळे जिल्ह्यातील बऱ्याच भागात पर्यटकांची रेलचेल सुरुच असते. याच साखळीत टिपेश्वर अभयारण्य (Tipeshwar Wildlife Sanctuary) देखील येते. टिपेश्वर अभयारण्यात हमखास पर्यटकांना वाघोबाचे दर्शन होत असते. अलीकडे वाघांचे दर्शन सतत होत असल्याने आता पर्यटकांचा ओढाही या अभयारण्यात वाढला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास तब्बल 10 वाघ भटकंती करताना याठिकाणी पाहायला मिळाले.
टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात बुधवारी सकाळच्या सुमारास पर्यटकांना जंगल सफारी करताना काही वाघ (Tiger) दिसून आले. प्रौढ आणि बछडे पकडून जवळपास 10 वाघ यावेळी पर्यटकांना दिसून आले. दरम्यान या वाघांचे फोटो देखील काही पर्यटकांनी टिपले असून सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभयारण्यात जवळपास 22 वाघ
तब्बल 148.63 चौरस किलोमीटरमध्ये हे अभयारण्य विखूरलेले असून या अभयारण्यात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यामुळे हमखास याठिकाणी वाघोबाचे दर्शन पर्यटकांना होत असते. त्यामुळे अनेकजण सुट्टी घालवण्यासाठी या अभयारण्यात येत असतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार या अभयारण्यात जवळपास 22 वाघ असल्याचे सांगितले जाते. मागील तीन ते चार वर्षांपासून या अभयारण्यात वाघांचे दर्शन सतत होत असल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. यामुळे वन्यजीव प्रेमी देखील आनंदी आहेत.
हे ही वाचा-
- मान्सूनवार्ता... आनंदवार्ता! यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर चारही महिन्यात पर्जन्यमान चांगलं राहणार
- Palghar : दिघाशी येथील गावदेवी यात्रेला भाविकांची मांदियाळी
- याला म्हणतात प्रेम! बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला; जीवाची बाजी लावून 72 वर्षीय पतीने वाचवला पत्नीचा जीव
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live