मान्सूनवार्ता... आनंदवार्ता! यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर चारही महिन्यात पर्जन्यमान चांगलं राहणार
Monsoon Update : यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही महिन्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे. अचूक अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया हवामान विभागाचं भाकीत.
India Monsoon : यंदाच्या वर्षी पाऊसमान (Monsoon Rain 2022) चांगलं राहणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही पावसाळी महिन्यात चांगाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आपल्या अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे. यंदा पर्जन्यमान चांगल राहिल्यानं दुष्काळ पडणार नसल्याचंही भाकित वर्तवण्यात आलं आहे. भारतीय हवामान खात्याकडून अद्याप कोणतंही भाकीत करण्यात आलेलं नाही. पण पुढील महिन्याच्या सुरुवातीला त्यांचेही अंदाज येऊ शकतात. यंदा पावसाळ्याला चांगल्या मान्सूनपूर्व पावसाची साथ मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं यावर्षी सर्वसामान्य पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचं हवामान खातं हे त्याच्या अचूक अंदाजासाठी जास्त प्रसिद्ध आहे. दरम्यान, भारतीय विभागाकडून अद्याप हवामान विभागाबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. कदाचित एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय एक्यूवेकर या वेदर कंपनीनेनदेखील भारतात यावर्षी दुष्काळ पडणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, यावर्षीही देशासह राज्यासाठी पावसाळा सुखावणारा होता. देशातील बहुतांश भागांत पावसानं जोरदार हजेरी लावली होती. अशातच ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदाच्या वर्षीही वरुणराजाची कृपादृष्टी कायम राहणार आहे. जर ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर बळीराजासाठी ही आनंदाची बातमी असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Weather : मुंबईची लाहीलाही! पारा वाढला, मुंबईकर हैराण, 24 तासांत तापमानात 5 अंशांची वाढ
- मास्क न घातल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून मुंबईकरांची सुटका होणार? मुंबई महापालिकेने मार्शलना दिली 'ही' सूचना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha