एक्स्प्लोर
लातूरमध्ये सापडला तब्बल 10 फुटांचा अजगर!
लातूर: लातूर जिल्ह्यात तब्बल 10 फूट लांब आणि 35 किलो वजनाचा अजगर आढळून आला आहे. दोन दिवसांपूर्वी लातूरच्या जलालपूर भागात अजगर असल्याची माहिती स्थानिक सर्पमित्रांना मिळाली होती. त्यांनी या अजगराचा शोध घेतला.
PHOTO: 10 फूट लांब अन् 35 किलो वजनाचा अजगर!
लोक घाबरुन या अजगराला ठार मारतील, अशी भीती सर्पमित्रांनी होती. त्यामुळं त्यांनी वन विभागाची मदत घेतली आणि या अजगराला कासार शिरशी भागातल्या पाणवठ्यामध्ये सोडण्यात आलं.
लातूर जिल्ह्याला लागूनच असलेल्या कर्नाटक किंवा आंध्रप्रदेशमधून हा अजगर आला असावा असा अंदाज बांधण्यात येतो आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement