एक्स्प्लोर

Pandharpur Vidhan Sabha : चंद्रशेखर बावनकुळे थेट विमानाने भेटीसाठी पोहोचले, बंद खोलीत चर्चा, तरीही प्रशांत परिचारकांच्या चेहऱ्यावर नाराजी कायम!

Pandharpur Vidhan Sabha : बंद खोलीत झालेल्या या बैठकीचा शेवट गोड झाला असला तरी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या चेहऱ्यावरची नाराजी मात्र दूर झालेली दिसत नव्हती.

Pandharpur Vidhan Sabha : एका घरात राहताना सुद्धा भांड्याला भांडे लागतात तसा तो प्रकार झाला होता. मात्र, आजच्या बैठकीने सर्व दुरावे गैरसमज संपले असून या विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवू, असा दावा आमदार समाधान आवताडे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या तिकिटासाठी रस्सीखेच होती. परिचारक हे तुतारी हातात घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार अशी जोरदार चर्चा सुरू असताना बंडखोरी शांत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारक समर्थक आणि अवताडे यांची एकत्रित बैठक घडवून आणली. बंद खोलीत झालेल्या या बैठकीचा शेवट गोड झाला असला तरी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या चेहऱ्यावरची नाराजी मात्र दूर झालेली दिसत नव्हती. ती स्थिती परिचारक समर्थकात होती. गेले दोन महिने प्रशांत परिचारक हे पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघात गावोगावी फिरून मतदारांचा कानोसा घेत होते. 

परिचारकांची नाराजी दूर करण्यासाठी बावनकुळे विमानाने सोलापुरात 

परिचारक रिंगणात उतरणार म्हणून भाजपनेही अवताडे यांचे तिकीट थांबवून ठेवले होते, तर अजूनही महाविकास आघाडीतील उमेदवाराची घोषणा झाली नव्हती. परिचारकांची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे खास विमानाने सोलापुरात येऊन त्यांनी पंढरपूरमध्ये परिचारकांच्या निवासस्थानी बंद खोलीत जवळपास दोन तास बैठक घेतली. या बैठकीत परिचारक समर्थकांनी अवताडींवर असलेली आपली नाराजी बोलून दाखवली. यानंतर आमदार आवताडे यांना परिचारक यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आले व पुन्हा बंद खोलीत अवताडे आणि परिचारक समर्थकांची बराच वेळ चर्चा झाली.  या चर्चेनंतर दोघातील वाद संपल्याचे दाखवण्यासाठी बावनकुळे यांनी दोघांनाही एकत्रित घेत अवताडे निवडणूक लढवतील असे जाहीर केले. यावेळी परिचारक यांच्या तोंडावरची नाराजी त्यांना लपवता येत नव्हती आणि हीच भाजपची डोकेदुखी ठरू शकते. परिचारक समर्थक काही मोठ्या प्रमाणात या बैठकीनंतर नाराज दिसून आल्याने आता खऱ्या अर्थाने यांचे मनोमिलन झाले का हा प्रश्न बाकी आहे.  

कार्यकर्त्यांची समजूत आणि जोमाने कामाला लागू

माझाशी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी आमच्यातले गैरसमज संपले असून आमच्या दोघात द्वेषाची भावना कधी नव्हती अशी सारवासारव करीत परिचारक आणि आपण मिळून पंढरपूर मंगळवेढ्यात ऐतिहासिक विजय मिळवू असा दावा केला. दुष्काळी मंगळवेढ्याच्या गावोगावात पाणी पोचवून मंगळवेढा हिरवागार करायचे स्वप्न आम्ही या वेळेला पूर्ण करत असून 24 गावांच्या योजना असेल किंवा ठीक ठिकाणी मंजूर झालेली बंधारे असतील. यामुळे मंगळवेढ्याचा दुष्काळी हा डाग उचला जाईल असेही त्यांनी सांगितले.  परिचारक यांनी मात्र सावध भूमिका घेत आपल्या आमदारकी पेक्षा पक्ष मोठा असून कार्यकर्त्यांची समजूत घालून जोमाने कामाला लागू असा दावा केला आहे. या बैठकीमध्ये परिचारकांना लवकरात लवकर विधानपरिषद देण्याचा शब्दही दिल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. आता या दोघात झालेले मनोमिलन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार का हाच प्रश्न असणार आहे. त्यामुळेच याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून केला जाणार का हेही येत्या प्रचारात दिसून येणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' चार मतदारसंघात भावांच्या तुलनेत लाडक्या बहिणी सर्वाधिक मतदान करणार! कोणासाठी निर्णायक ठरणार?
कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' चार मतदारसंघात भावांच्या तुलनेत लाडक्या बहिणी सर्वाधिक मतदान करणार! कोणासाठी निर्णायक ठरणार?
Radhakrishna Vikhe Patil : 'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'
दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'
Amol Mitkari: अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनातली खंत दाखवली बोलून
अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनातली खंत दाखवली बोलून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ganesh Gite Nashik : उमेदवारी मिळाल्यानंतर गणेश गीतेंचं नाशिकमध्ये स्वागतThackeray Group Ghatkopar :  घाटकोपर पश्चिममध्ये ठाकरे गटाकडून संजय भालेराव यांना उमेदवारीKolhapur BJP Conflict : कोल्हापुरातील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरGulabrao Patil Jalgaon : बाप्पाचं दर्शन घेत गुलाबराव पाटलांनी केली प्रचाराला सुरूवात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' चार मतदारसंघात भावांच्या तुलनेत लाडक्या बहिणी सर्वाधिक मतदान करणार! कोणासाठी निर्णायक ठरणार?
कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' चार मतदारसंघात भावांच्या तुलनेत लाडक्या बहिणी सर्वाधिक मतदान करणार! कोणासाठी निर्णायक ठरणार?
Radhakrishna Vikhe Patil : 'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'
दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'
Amol Mitkari: अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनातली खंत दाखवली बोलून
अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनातली खंत दाखवली बोलून
क्षमस्व! मी निवडणूक लढवणार नाही, प्रभाकर देशमुखांची माण खटावच्या मैदानातून माघार, पडद्यामागं नेमकं काय घडलं?
क्षमस्व! मी निवडणूक लढवणार नाही, प्रभाकर देशमुखांची माण खटावच्या मैदानातून माघार, पडद्यामागं नेमकं काय घडलं?
Mahayuti seat sharing: महायुतीचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार, सागर बंगल्यावर यादीवर शेवटचा हात फिरवणार, मुंबईत कोणते उमेदवार?
महायुतीचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार, सागर बंगल्यावर यादीवर शेवटचा हात फिरवणार, मुंबईत कोणते उमेदवार?
Jayashree Thorat : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
Jayshree Thorat: जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य म्हणाल्या, 'आचारसंहिता भंग...'
जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य म्हणाल्या, 'आचारसंहिता भंग...'
Embed widget