Maharashtra Rain Update : अतिवृष्टीचं थैमान! मराठवाड्यासह राज्यभरात पावसाचा जोर कायम; हवामान खात्याकडून महत्त्वाचा अलर्ट जारी, वाचा पावसाच्या सर्व अपडेट्स
Maharashtra Weather Update: राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तर दुसरीकडे अद्याप राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची रीपरीप सुरूच असल्याचे चित्र आहे.

Maharashtra Rain Update : राज्यातील बहुतांश जिल्ह्याला मुसळधार पावसाने (Heavy Rain) अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित विभागात आज (सोमवार, 29 सप्टेंबर) देखील पावसाच्या सरी(Maharashtra Rain) कोसळणार असल्याचे अंदाज आहे. तर दुसरीकडे अद्याप राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची (Maharashtra Rain Alert) रीपरीप सुरूच असल्याचे चित्र आहे. अशातच, कधी नव्हे तो मराठवाड्यात (Marathwada Rain Update) अतिवृष्टी झाल्याचे बघायला मिळाले आहे. सध्या मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. मराठवाड्यातला पाऊस जरी ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत. मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला पूर आलाय. 2006 नंतर प्रथमच जवळपास तीन लाख क्युसेक्स एवढा विसर्ग जायकवाडी धरणातून करण्यात येतोय. त्यामुळे पैठण शहरात पाणी घुसायला सुरुवात झाली आहे.
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. पैठण तालुक्यातील ही अनेक लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.. पुढे जालना शहरातही अनेकांना रेस्क्यू करण्यात आलं. परभणी, नांदेड मध्ये ही गोदाकाटची स्थिती अशीच आहे. जसजस गोदावरी नदीचे पाणी नांदेड मध्ये पोहोचेल तस तशी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी (IMD issues alert for Mumbai)
भारतीय हवामान विभाग (IMD)च्या अंदाजानुसार, आज मुंबईत ढगाळ वातावरण आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. आज देखील मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरसह नजीकच्या भागासाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आज दिवसभर ढगाळ आकाश राहील आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाची दाहकता समोर (Nashik Rain Update)
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे 3 नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर 2 जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण 32 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यात मोठे दुधाळ जनावरे 8, लहान दुधाळ जनावरे 22, ओढकाम करणाऱ्या जनावरे 2, आणि 248 कुक्कुट पक्षाचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील एकूण 147 घरांचे नुकसान झाले आहे. यात कच्चा 129 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तर 7 कच्च्या घरांचे पुर्णतः नुकसान झाले असून पक्क्या 11 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. दुसरीकडे, 135 नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून जिल्ह्यातील 15 झोपड्या आणि एका गोठ्याचे नुकसान झाले आहे.
नाशिक शहरातील पावसाचा जोर वाढला, गोदावरी नदीला पूर (Godavari River Floods)
नाशिक शहरातील पावसाचा जोर काल सायंकाळ पासून कमी झाला असला तरीही गोदावरी नदीची पूरस्थिती कायम आहे, यंदाचा मोसमातील सर्वाधिक विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे, गोदामाईच्या पुरात नाशिक च्या पुराचे प्रमाण म्हणून ओळखला जाणाऱ्या दुतोंडया मारुतीच्या माथ्यावरून पाणी जात होते, रात्रीपासून पाणी काही प्रमाणात कमी झाल्यान दुतोंडया मारुतीच्या छाती पर्यत पाणी आहे, सध्या गंगापूर धरणातून 10 हजार 988 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात असून अहिल्याबाई होळकर पुला पासून 11 हजार 210 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे, पुन्हा पावसाचा जोर वाढला तर पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार असून पूर स्थितीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनाही रात्री उशीरा गोदावरी नदीच्या पुराची पहाणी करत काही नागरिकच्या भेटी घेत नुकसानीची पहाणी केली
बीडच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; गोदावरी काठची अनेक मंदिरं पाण्याखाली (Beed Rain Update)
बीडच्या जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी काठची मंदिरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.. राक्षसभवन येथील शनी मंदिर पांचाळेश्वर मंदिर ही ऐतिहासिक मंदिरं सध्या पाण्यात आहेत. आज मध्य रात्रीपासून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला. परिणामी नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून प्रशासनासह नागरिकांनी स्वतः आपले स्थलांतर सुरक्षित स्थळी केले आहे. गेवराई तालुक्यातील 45 गावांना या पाण्याचा धोका असल्याने किमान पंधरा दिवस पुरेल इतका जीवनावश्यक साठा नागरिकांनी सोबत घेऊन स्थलांतर केले आहे.
आष्टी तालुक्याला पावसाने झोडपले; सीना आणि मेहेकरी नदीच्या परिसरातून 13 जणांना रेस्क्यू
बीडच्या आष्टी तालुक्याला देखील मुसळधार पावसाने दोन दिवस झोडपून काढल. रविवारी मुसळधार झालेल्या पावसाने आष्टी तालुक्यातील सीना आणि मेहेकरी नदीला पूर आला.. त्यामुळे नदीकाठच्या हिंगणी गावात काही शेतकरी आणि स्थानिक नागरिक अडकले होते. एनडीआरएफ च्या माध्यमातून बचाव कार्य पूर्ण झाले असून या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल आहे.
तर दुसरीकडे, आष्टी तालुक्यात मागील दोन दिवस आणि गत आठवड्यात झालेल्या पावसाने अनेक नदी नाल्यांना पूर आला. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. शेती पिकांचे नुकसान झालेच मात्र अनेकांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. दरम्यान पूरस्थिती पाहता प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग वाढवला (Dharashiv Rain Update)
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अहिल्यानगर,आष्टी,कडा,जामखेड,कर्जत या भागता मुसळधार पाऊस होत असुन त्यामुळे सिना कोळेगाव प्रकल्पातुन 91 हजार 200 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग राञी पासुन वाढवुन 1 लाख 4 हजार 600 क्युसेकने सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे सिना नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकरी व नागरीकांनी सावधानता बाळगावी अस आवाहन प्रशासनाने केल आहे.
हे हि वाचा
























