एक्स्प्लोर

gadkari Vs fadnavis: भाजपमध्ये नितीन गडकरी विरुद्ध फडणवीस असा वाद; शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याचा दावा

भाजप पक्षात वाद असून त्याचे पडसाद विदर्भात पाहायला मिळत असल्याचा दावा खैरे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावर भाजपकडून काय प्रतिकिया दिली जाते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Bjp Disputes: भाजपात पक्षांर्तगत अनेक वाद असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari)  विरुद्ध देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) असा वाद असल्याचा दावा शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरात पाण्याच्या मुद्यावरून काढण्यात येणाऱ्या मोर्च्याला लावण्यात आलेल्या बॅनरवर नितीन गडकरी यांचा फोटो नसल्याने यावर प्रतिक्रिया देताना खैरेंनी हे विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. 

यावेळी बोलताना खैरे म्हणाले की, भाजप पक्षात अंतर्गत खूप काही भांडणं आहेत. नितीन गडकरी विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा वाद आहे. त्यामुळे याचा प्रत्यक्षात विदर्भात सुद्धा परिणाम होताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या या वादाशी आम्हाला काही देणंघेणं नाही असं खैरे म्हणाले. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये भाजपकडून लावण्यात आलेल्या होर्डिंगवर गडकरी यांचे फोटो नसल्याने चर्चा होत असतानाच खैरे यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे खैरेंच्या विधानामुळे पुन्हा एकदा भाजपमधील पक्षांतर्गत वादाची चर्चा समोर अली आहे. त्यामुळे खैरेंच्या आरोपाला भाजपकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

शिवसेनेला श्रेय मिळू नयेत म्हणून भाजपचं नाटक... 

औरंगाबादमध्ये भाजपकडून काढण्यात येत असलेल्या 'जल आक्रोश मोर्च्या'वर बोलताना खैरे म्हणाले की, मी आणलेली समांतर जल योजना काँग्रेसच्या काळात आणली होती. यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (sharad pawar) यांनी बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे या योजेनच श्रेय शिवसेनेला मिळेल,उद्धव ठाकरेंना मिळेल असे भाजपला वाटत असून त्यामुळेच हे सर्व नाटकं सुरु असल्याचं खैरे म्हणाले. तर मी आणलेल्या योजनेचं कौतुक झाले होते. लोकसभेत त्यावेळच्या मंत्र्यांनी सुद्धा खूप चांगली योजना असल्याचं म्हटलं होते. पण भाजपने होऊ दिले नसल्याने आज औरंगाबादकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप सुद्धा भाजपकडून करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : भारतीय आयकर विभागाता नोकरीची संधी; कोणत्या पदांवर जागा? #abpमाझाABP Majha Headlines 8 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मविआत ठाकरे सावत्र भावाच्या भूमिकेत, नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोलPune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Embed widget